Ginger Farming : विदर्भात आल्यापासून शेतकऱ्यांना चांगला परतावा

Ginger Rate : सध्या कळमना बाजारात ३००० ते १०००० रुपये क्‍विंटलने आल्याचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
Ginger Rate
Ginger Rate Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भात गेल्या काही वर्षात आले पीक फायद्याचे ठरत आहे. त्यामुळेच या पिकाखालील क्षेत्रातही वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या कळमना बाजारात ३००० ते १०००० रुपये क्‍विंटलने आल्याचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. अमरावती बाजारात ७००० ते १०००० रुपयांचा दर आल्याला मिळाला.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लागवड केल्यानंतर नवीन फुटवे येतात. त्याला येणाऱ्या आले (कंद) याला कमी दर राहतो. अपेक्षित रंगधारणा येत नसल्याने दर कमी राहतो. मात्र याचवेळी जमिनीच्या आतील जुन्या खोडव्याला फुटवे फुटत लागणाऱ्या आले कंदाला दर चांगला मिळतो. नवीन फुटव्यांना लागणारा कंद आणि जुन्या खोडव्याला लागणाऱ्या कंदाच्या दरात मोठी तफावत राहते. या वर्षीच्या हंगामात आल्याला सरासरी दर १० हजार रुपयांचा राहिला आहे.

Ginger Rate
Ginger Farming : गादीवाफा पद्धतीने आले लागवडीवर भर

बंगलोर (कर्नाटक) भागातून आवक झाल्यास आले दरात घसरण होते. गेल्या चार-पाच वर्षांत कर्नाटकातील आले आवक झाली नाही. परिणामी दर दहा हजार रुपयांच्या पुढेच राहिले. यंदा मात्र कर्नाटकातील आल्याची आवक महाराष्ट्रातील बाजारात होईल, अशी चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. यंदा एप्रिलपासून चांगला दर मिळाला आहे. त्यात जास्त चढ-उतार अनुभवले गेले नाहीत. खेडा खरेदीतून ९५०० रुपयांचा दर मिळाला.

Ginger Rate
Ginger Market : आले पिकाच्या दरात सात ते आठ हजारांनी घट

जागेवरून खरेदी करणारे व्यापारी ओलावा असल्याचे कारण देत ४० किलोमागे तीन किलो कडता घेतात. बाजारात वाळलेले आले न्यावे लागते. त्यामुळे जागेवर मिळणारा हा दरही चांगला परतावा देतो. माल अधिक असल्यास मात्र बाजारातच विक्रीसाठी नेणे फायद्याचे ठरते, असे आले उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.

गेल्यावर्षी १४ हजार २०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यावर्षी ९१०० ते ११ हजार १०० रुपयांचा दर मिळाला आहे. आल्याचे दर दहा हजार रुपयांच्या पुढेच राहत असल्याने हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

आले पिकाच्या एकरी व्यवस्थापनावर दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च होतो. त्यामध्ये सर्वाधिक खर्च हा बेण्यावर होतो. गेल्यावर्षी बेणे दर १२ हजार रुपये क्‍विंटल होते. एकरी दहा ते ११ क्‍विंटल बेणे लागते. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड होते. उशीर झाल्यानंतर उत्पन्नात घट होते. डिसेंबर ते जून या कालावधीत हे पीक काढणीसाठी येते. एकरी १०० ते १५० क्‍विंटल अशी उत्पादकता मिळते. बाजारात १० ते ११ हजार रुपये क्‍विंटल दर आहे.
- प्रकाश रामेश्‍वर धांडे, शेतकरी, येसापूर, ता. लोणार, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com