नगर : मटकीच्या क्षेत्रात (Moth Bean Area) वाढ व्हावी, बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी कडधान्य (Pulses) श्रेणीतील मटकीच्या (मठ) उत्पादनाकडे (Moth Bean Production) वळावे यासाठी संगमनेर तालुक्यातील चार गावांत मटकीच्या सुधारित वाणांची (Improved Verity Of Moth Bean) ४० एकरांवर प्रायोगिक तत्त्वावर लागवड (Moth Bean Cultivation) केली आहे. कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जात असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमात ८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागात बाजरी किंवा कडवळाच्या क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मठ, मूग, हुलगा आदी कडधान्यांची लागवड पूर्वापार पद्धतीने केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत घरगुती पारंपरिक बियाण्यांच्या स्थानिक वाणाच्या वापरातून मठाचे उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील चार गावांत यंदा सुधारित वाणांच्या मटकीची लागवड करण्याचा प्रयोग कृषी विभाग करत आहे. देशात मटकीचे सर्वाधिक क्षेत्र राजस्थानमध्ये आहे. जोधपूरच्या केंद्रीय शुष्क क्षेत्र अनुसंधान संस्थेशी याबाबत संपर्क केला असता, त्यांच्याकडून मटकीचा नवीन व सुधारित वाण बिकानेरमधील (राजस्थान) स्वामी केशवानंद कृषी विद्यापीठात असल्याची माहिती मिळाली. आरएमओ २२५१ या सुधारित वाणाचे २ क्विंटल बियाणे मिळाले. एका एकरासाठी पाच किलो बियाणे लागते.
साधारणपणे अर्धा एकरासाठी प्रत्येकी ८० शेतकऱ्यांना ही बियाणे दिले असून ४० एकरांवर लागवड केली आहे. ‘आत्मा’अंतर्गत प्रात्यक्षिक म्हणून तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी, पेमरेवाडी, माळवाडी, तसेच तळेगाव गटातील देवकौठे येथील शेतकऱ्यांच्या गटाला बियाणे देऊन मटकी क्षेत्र आणि उत्पादन वाढीसाठी राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग राबवला जात असल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले.
वाणाची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्रात साधारणपणे पारंपरिक मटकीचे १२० ते १२५ दिवसांत उत्पादन निघते. आरएमओ २२५१ हा वाण मात्र अवघ्या ६७ दिवसांत निघतो.
- या वाणाचे पीक आपल्याकडील पारंपरिक मठासारखे जमिनीलगत पसरट न वाढता ते उभे वाढत असल्याने आंतरमशागतीला तसेच काढणीला सोपे जाते. नासाडी होत नाही.
- पीक परिपक्व झाल्यानंतरही त्याची पाने हिरवीच राहत असल्याने, त्यांचा उपयोग जनावरांना चारा किंवा हिरवळीच्या खतासाठी होतो.
- राजस्थानातील शुष्क वातावरणात या मटकीच्या वाणाचे हेक्टरी ५ ते ८ क्विंटल उत्पन्न मिळते. या भागातील जमिनीची प्रत, व वातावरण पाहता त्यापेक्षाही अधिक उत्पादन निघण्याचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.
कडधान्यातील मटकी हे महत्त्वाचे आहे. मात्र अलीकडच्या काळात मटकीचे क्षेत्र कमी हो आहे. मागणी असताना मटकीचे क्षेत्र वाढले पाहिजे व सुधारित वाणांतून उत्पादनही वाढले पाहिजे या हेतूने संगमनेरमधील पठार भागात मटकी लागवडीचा प्रयोग कृषी विभाग राबवत आहे.सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.