Rice Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

FCI Rice Price: इथेनॉल प्रकल्‍पांसाठी लागणाऱ्या ‘एफसीआय’ तांदळाच्या किमतीत घट!

Relief for Ethanol Producers: केंद्राने धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांना दिलासा देत इथेनॉलसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: केंद्राने धान्य-आधारित इथेनॉल उत्पादकांना दिलासा देत इथेनॉलसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट केली आहे. सध्याच्या प्रति क्विंटल २८०० रुपयांवरून ही किंमत २२५० रुपये निश्चत करत इथेनॉल निर्मितीला पाठबळ दिले आहे.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने भारतीय अन्न महामंडळाला काढलेल्या आदेशात ही माहिती दिली आहे. केंद्राने २०२४-२५ साठी खुल्या बाजार विक्री योजना धोरणांतर्गत बफर स्टॉक मानदंडांपेक्षा जास्त तांदळाच्या साठ्याच्या विक्रीसाठीच्या तरतुदीत सुधारणा केली आहे.

शुक्रवारी(ता.१७) काढलेल्या आदेशानुसार, फक्त इथेनॉल पुरवठादार म्हणून तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणीकृत असलेल्या डिस्टिलरीजनाच नव्‍या दराने तांदूळ खरेदीला परवानगी असेल. इथेनॉल पुरवठ्याबाबत तेल कंपन्‍यांबरोबर स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रतीसह डिस्टिलरीज त्यांच्या पसंतीच्या भारतीय अन्न मंडळाच्या (एफसीआय) डेपोशी संपर्क साधू शकतात.

हे डेपो तेल कंपन्यांशी जितका करार आहे, त्‍या प्रमाणात तांदळाचे वाटप करतील. याचबरोबर तेल कंपन्‍या या तांदळापासून उत्पादित इथेनॉलची माहिती भारतीय अन्न मंडळाला देतील. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आदेशानुसार, २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील सुमारे ११० कोटी लिटर इथेनॉल पुरवण्यासाठी सायकल ३ अंतर्गत निविदा काढण्यासाठी एफसीआय तांदळाचा वापर करून उत्पादित इथेनॉलपुरते मर्यादित ठेवावे. हे धोरण ३० जून २०२५ पर्यंत वैध असेल.

तांदळाची किंमत २२५० रुपये निश्चित

या निर्णयाबरोबरच ई-लिलावाद्वारे विक्री होणाऱ्या सहकारी व खासगी संस्थांना प्रति क्विंटल २८०० रुपये, छोट्या उद्योजकांना पुरवठा होणाऱ्या तांदळासाठी २८०० रुपये किंमत ठरविण्यात आली आहे. ई लिलावात सहभागी न होता राज्य सरकारना देण्यात येणाऱ्या तांदळाची किंमत २२५० रुपये निश्चित केली आहे.

इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता

ऑगस्ट २०२४ मध्ये सरकारने २०२३ मध्ये इथेनॉल डिस्टिलरीजवर लादलेली तांदूळ विक्रीवरील बंदी उठवली आणि केंद्रीय धान्य साठ्यातून २३ लाख टन (ऑगस्ट-ऑक्टोबर २०२४ दरम्यान) खरेदी करण्याची परवानगी दिली. ई-लिलावाद्वारे तांदूळ विकला जाणार होता. तथापि, आर्थिक व्यवहार्यतेचा अभाव असल्याचे कारण देत इथेनॉल उत्पादकांकडून अंतर्गत तांदूळ खरेदीदार नव्हते. आता या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात सुमारे ९३० कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT