Ambemohar Rice : आंबेमोहोर तांदूळ दरात तेजी

Rice Market Update : आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबेमोहोर तांदळाने हंगामात तेजी घेतली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढून घाऊक बाजारपेठेत ८ ते ९ हजार प्रति क्विंटलवर दर पोहोचले आहेत,
Ambemohar Rice
Ambemohar RiceAgrowon
Published on
Updated on

Pune News : आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबेमोहोर तांदळाने हंगामात तेजी घेतली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच गतवर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढून घाऊक बाजारपेठेत ८ ते ९ हजार प्रति क्विंटलवर दर पोहोचले आहेत, अशी माहिती जयराज व कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी दिली.

भाववाढी बाबत सांगताना शहा म्हणाले, ‘‘गेल्या हंगामाच्या प्रारंभीला हे दर ७ ते ७ हजार ५०० होते. यावर्षी प्रति क्विंटल मागे ५०० ते १ हजार भाववाढ झाली आहे. या भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळावरची निर्यात बंदी उठवली. तसेच त्यावेळी असणारे २० टक्के निर्यात कर सुद्धा सरकारने कमी केला आहे.

Ambemohar Rice
Kolhapur Rice Production : भाताचे दाणेच भरले नाहीत, अतिपावसाने कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात भाताचे उत्पादन घटलं

महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८० टक्के तांदूळ हा मध्य प्रदेशातून तर उर्वरित २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेशातून होत आहे. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधिक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे भाववाढ झालेली आहे’’.

Ambemohar Rice
Rice Export : विदर्भातील तांदूळ निर्यात पोहोचली बारा लाख क्विंटलवर

‘‘आंबेमोहोर हा सुंगधी तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोरला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. प्रति किलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोरचे दर पोहोचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आंबेमोहोराच्या आगाराला उतरती कळा

महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात कामशेत, भोर या भागांत काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. परंतु हा तांदूळ पिकणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे, असे निरीक्षणही शहा यांनी नोंदविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com