Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस दर वाढीकडे उत्पादकांच्या नजरा

Cotton Rate : कापसाची उत्पादकता घटली असतानाच बाजारात कापसाला दरही नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कापसाची उत्पादकता घटली असतानाच बाजारात कापसाला दरही नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. कापसाला केंद्राने ७०२० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असून त्याच दरात कापसाची खरेदी होत आहे.

बाजारात कापसाची आवक वाढल्यास यात घसरण होण्याची भीती तज्ज्ञ वर्तवितात. त्या पार्श्‍वभूमीवर पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.

देशात सरासरीच्या १३० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड यंदा झाली आहे. महाराष्ट्रात ४२ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड असून त्यापासून ८० लाख गाठी (४०० लाख क्‍विंटल) कापसाची उत्पादकता अपेक्षित आहे. राज्याच्या काही भागात पावसाने खंड दिला.

त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे. त्यासोबतच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव काही भागात दिसून आला. त्याचाही परिणाम बाजारातील आवकेवर होणार असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातच मागणी नसल्यामुळे दरात वाढीची शक्‍यता नसल्याचे विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले.

बाजारात उपलब्ध आर्टिफिशियल फायबरचा वापर ४० ते ४५ टक्‍के होतो. त्यामुळे देखील कापसातील तेजी प्रभावित झाली आहे. असे असले तरी कापसाचे दर ७००० रुपयांपेक्षा कमी होणार नाहीत, असेही श्री. वैराळे यांनी सांगितले.

कापसाच्या दरात तेजी येईल या शक्‍यतेने २०२२-२३ या हंगामातील कापसाची साठवणूक शेतकऱ्यांनी केली होती. असा शिल्लक कापूस देखील पाच लाख क्‍विंटलच्या आसपास आहे. आता भाववाढीची शक्‍यता नसल्याने यंदाच्या हंगामात त्याचीही बाजारात आवक होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जागतिक बाजारात ९० ते ९५ सेंट प्रतिपाऊंड रुई असा दर आहे. सरकीमध्ये आलेल्या तेजीमुळे दर टिकून आहेत. त्यामुळे सात हजार रुपयांच्या आसपास दर राहतील. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने बोनस देऊन कापसाची खरेदी केली पाहिजे. गहू २२२० रुपये आहे. मध्यप्रदेशात २७०० रुपयांनी खरेदीचे आश्‍वासन भाजपने दिले आहे. मग कापसाला हा निकष का लावला जात नाही?
- विजय जावंधिया, शेती प्रश्‍नाचे अभ्यासक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT