China America
China America  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

China US War : चीन-अमेरिकेची युध्दखोरी शेतकऱ्यांच्या मुळावर?

अनिल जाधव

पुणेः तैवानच्या मुद्द्यावरून सध्या अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीन आणि तैवानमध्ये युध्द होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र युद्ध झाले किंवा तणाव वाढला तर दोन्ही देशांना फटका बसणार आहे. कारण अमेरिका आणि चीनचे एकमेकांवर अवलंबित्व आहे.

अमेरिका आणि तैवानचे चांगले संबंध आहेत. तैवान चीनच्या अगदी हनुवटीखालचा देश आहे. परंतु १९५० नंतर गेली ७० वर्षे अमेरिकेच्या कृपेने तैवानची अर्थव्यवस्था विकसित झाली. कम्युनिस्ट चीनच्या बगलेत तैवानच्या रूपाने अमेरिकेने भांडवलशाही विकासाचं मॉडेल राबवलं. तैवानचा घास घेण्यासाठी चीनचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया आणि चीन अधिक जवळ आले. तेव्हापासूनच चीन तैवानवर हक्क सांगायला सुरुवात करेल, अशी चर्चा नव्याने सुरू झाली.

अमेरिकन काँग्रेसच्या ८२ वर्षांच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) चीनच्या कडव्या टीकाकार आहेत. पेलोसी यांनी तैवानला भेट देण्याचे जाहीर केले. त्यावर आम्ही दक्षिण चीन सागरात काही गंभीर लष्करी पावले (Military Action) उचलू असा इशारा खुद्द चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग (Xi Jinping ) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना दिला. परंतु पेलोसी यांनी हा विरोध झुगारून हट्टाने तैवानला भेट दिली.अमेरिका तैवानला एकटं सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

पेलोसी यांच्या दौऱ्यामुळं दुखावलेल्या चीनने तैवानला चोहोबाजूंनी घेरलं. तैवानच्या चारही बाजूंनी नो एन्ट्री झोन घोषित केलाय. त्याचबरोबर जलमार्ग आणि हवाईमार्गांना बंदी घातली आहे. त्यामुळे आता नवा पेच निर्माण झालाय. चीन आणि अमेरिका या दोन आर्थिक महासत्ता आमनेसामने आल्या आहेत. तैवान आणि चीनमध्ये युद्ध पेटल्यास हे युद्ध थेट चीन आणि अमेरिका असंच असेल, असं जाणकार सांगतात. पण युद्ध दोन्ही देशांना पडवणारे नसेल.

सध्या जागतिक बाजारपेठेत चीनने विकसित केलेल्या जागतिक पुरवठा साखळ्या म्हणजे ग्लोबल सप्लाय चेन्स केंद्रस्थानी आहेत. कोरोना महामारी आणि नंतर रशिया-युक्रेन युध्द यामुळे या पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या. विशेषतः शेतीमालाच्या पुरवठा साखळ्यांना मोठे हादरे बसले. शेतीमालाच्या बाजारपेठेत उलथापालथ झाली. जग अजून त्या धक्क्यातून सावरलेले नसताना रशिया-अमेरिका तणाव पैदा झाला आहे.

शेतीमालाच्या जागतिक बाजारपेठेत चीन हा सगळ्यात मोठा खेळाडू आहे. तैवानमधील तणावामुळे अमेरिकेला थेट फटका बसणार असला तरी भारतासह जगातील सगळ्याच देशांना त्याच्या झळा बसणार आहेत. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

जगात चीनची शेतीमाल बाजारपेठ सर्वांत मोठी आहे. चीन दरवर्षी विविध देशांतून सोयाबीन, मका, गहू आणि बार्लीची मोठ्या प्रमाणात आयात करतो. अमेरिका आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय करारामुळे मागील दोन वर्षांत व्यापार चांगलाच वाढला. त्यात शेतीमाल व्यापाराचं प्रमाण मोठं आहे. चीन हा अमेरिकेच्या शेतीमालाचंही सर्वात मोठ मार्केट आहे. अमेरिका चीनला सोयाबीन, मका, कापूस, गहू, बार्ली, ज्वारी, डेअरी उत्पादनं, चिकन आणि पोल्ट्री उत्पादनं, पाॅर्क आणि बीफ निर्यात करतो.

अमेरिकेची चीनला सोयाबीन निर्यात

अमेरिका चीनला करत असलेल्या शेतीमाल निर्यातीत सोयाबीनचा वाटा सर्वाधिक आहे. चीन दरवर्षी ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीनातून जवळपास ९९० लाख टन सोयाबीन आयात करतो. मात्र मागील वर्षात चीनने अमेरिकेच्या सोयाबीनची आयात २५ टक्क्यांनी वाढवली. मागील वर्षात चीनने ३२३ लाख टन सोयाबीन आयात केली. २०२०-२१ मधील हाच आयात २५८ लाख टन होती. तसं पाहिलं तर चीन हा ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे. पण मागील हंगामात ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटलं. त्यामुळं चीनला आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवावा लागला. चीनची मागणी वाढल्यानं अमेरिकेच्या सोयाबीनचेही दर वाढले होते.

अमेरिकेची चीनला मका निर्यात

अमेरिकेची चीनला मका निर्यात दीडपटीने वाढलीय. मका निर्यात ११३ लाख टनावरून २८३ लाख टनावर गेलीय. चीनच्या एकूण गरजेच्या जवळपास ४० टक्के मका अमेरिकेतून येतो. अमेरिकेतून चीनला होणारी गहू निर्यात मागील वर्षात जवळपास १७ टक्क्यांनी वाढली. तर ज्वारीची निर्यात जवळपास दुप्पट झाली.

गहू आणि ज्वारीचा व्यापार

सोयाबीन आणि मक्यासह चीन गहू आणि ज्वारीचीही मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून आयात करतो. अमेरिकेची चीनला गहू निर्यात मागील वर्षात जावळपास १७ टक्क्यांनी वाढली. चीनने मागीलवर्षी ९८ लाख टन गहू अमेरिकेतून घेतला. तर त्याआधीच्या वर्षात ८४ लाख टनांची आयात केली होती. तर ज्वारीचीही आयात जवळपास दुप्पट झाली. चीननं मागीलवर्षी ९४ लाख टन, तर त्याआधीच्या वर्षात ४८ लाख टन ज्वारी अमेरिकेतून आयात केली.

यावरून असं लक्षात येतं की चीन हा अमेरिकेच्या शेतीमालाचा मुख्य ग्राहक आहे. चीन शेतीमालासाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे तैवानमधील तणावाचा परिणाम दोन देशांतील व्यापारावर झाला तर दोघांनाही त्याची जबर किंमत मोजावी लागेल. तसेच सोयाबीन, मका, गहू इत्यादी शेतीमालाची जागतिक बाजारातील गणितं उलटीसुलटी होऊन जातील. त्याचा भारतासह अनेक देशांवर थेट परिणाम होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT