Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : दराअभावी शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला ट्रॅक्टर

Onion Market Update : केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणानंतर बाजारात कांदा मातीमोल दराने विकला जात आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणानंतर बाजारात कांदा मातीमोल दराने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना. या असाह्यतेतूनच कोंडी (ता.उत्तर सोलापूर) येथील दामोदर नीळ या शेतकऱ्याने कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

गेल्या महिन्यात प्रती किलो चाळीस रुपये दराने विकला जाणारा कांदा ग्राहकाअभावी बाजार समितीत मोफत देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी जाहीर केली.

या निर्णयानंतर कांद्याच्या दरात दररोज घसरण सुरू आहे. शुक्रवारी (ता.२२) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.

कांद्याला मिळाला मिळालेला हा दर कांदा उत्पादनाचा खर्च निघण्यासाठी पुरेसा नाहीच, पण वाहतुकीचा खर्चही काढू शकला नाही, असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. बाजारातील कांद्याच्या या परिस्थितीमुळे उद्विग्न झालेल्या कोंडी येथील शेतकऱ्याने आपल्या कांद्यावर रोटावेटर फिरवला आहे.

कांदा काढण्यासाठी लागणारी मजुरी, बारदाण्याची किंमत व वाहतुकीचे पैसे हे सध्याच्या दरात कांदा विक्रीतून निघत नाहीत. त्यामुळे कांदा शेतातच गाडण्याचा निर्णय घेतला. आज कांदा ट्रॅक्टरखाली चिरडून टाकला आहे.
- दामोदर नीळ, शेतकरी, (कोंडी, ता.उत्तर सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT