Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : राज्यातून बेदाण्याची ४५ हजार टनांची निर्यात

Raisin Export : राज्यातून सुमारे ११४ देशांत बेदाण्याची निर्यात होते. प्रामुख्याने मोरोक्को, रोमानिया, रशिया, सौदी अरब, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया देशातून महाराष्ट्रातील बेदाण्याला मागणी आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : इराण आणि तुर्की या देशातील बेदाणा जगभरात सर्वाधिक बेदाणा निर्यात होते. मात्र गतवर्षी इराण आणि तुर्की या देशांतील बेदाण्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले. परिणामी जगभराच्या बाजारपेठेत राज्यातील बेदाण्याला मागणी वाढली. यामुळे गतवर्षी राज्यातून ४५ हजार ४३६ टन बेदाण्याची निर्यात झाली. २०२२-२३ च्या तुनलेत १९ हजार २१५ टनांनी निर्यात वाढली असल्याची माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.

राज्यातून सुमारे ११४ देशांत बेदाण्याची निर्यात होते. प्रामुख्याने मोरोक्को, रोमानिया, रशिया, सौदी अरब, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया देशातून महाराष्ट्रातील बेदाण्याला मागणी आहे. त्यामुळे राज्यातून या सात देशात सर्वाधिक बेदाण्याची निर्यात होते. राज्यातून चॉकलेटी आणि काळा बेदाणा प्रामुख्याने निर्यात होतो. हा निर्यात होणारा बेदाणा बेकरी पदार्थांसाठी वापरला जातो. बेदाणा बेकरी पदार्थांसाठी वापरण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बेदाण्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे राज्यातून दरवर्षी कमीअधिक प्रमाणातला बेदाणा निर्यात केला जातो.

जगभरातील बाजारपेठेत इराण, तुर्की या देशांतून सर्वाधिक बेदाणा निर्यात केला जातो. मात्र गेल्या वर्षी या दोन्ही देशांत बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण नसल्याने सुमारे ६० टक्के उत्पादन घटले असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

परदेशातून बेकरी पदार्थांमध्ये वापरण्यासाठी बेदाण्याची मागणी वाढल्याने बेदाण्याचा उठाव होऊ लागला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून यामुळे बेदाण्याची निर्यातीत वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये २६ हजार २२० टन तर २०२३-२४ मध्ये ४५ हजार ४३५ टन निर्यात झाली. दोन वर्षांपूर्वीच्या तुनलेत गतवर्षी १९ हजार २१५ टनांनी निर्यात वाढली आहे.

निर्यातीत राज्याचा वाटा सर्वाधिक

मुळात महाराष्ट्रातूनच इतर राज्यांत बेदाणा विक्री होतो. त्यामुळे इतर राज्यांतील निर्यातदारही बेदाण्याची निर्यात करतात. देशातून गतवर्षी ४७ हजार ७५० टन बेदाण्याची निर्यात झाली आहे. त्यापैकी राज्यातून ४५ हजार ३३५ टन बेदाणा सात समुद्रापार पोहोचला आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातींपैकी ८० ते ८५ टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे.

राज्यातून बेदाणा निर्यात झालेला दृष्टीक्षेप

वर्ष....निर्यात टनात

२०२१-२२...१७७४०.६०

२०२२-२३...२६२२०.८४

२०२३-२४...४५४३५.९१

देशातून बेदणा निर्यात झालेला दृष्टीक्षेप

वर्ष....निर्यात टनांत

२०२१-२२...१९५२०.६७

२०२२-२३...२७६४०.५८

२०२३-२४...४७७५०.६०

जगभरातून बेकरी पदार्थ उत्पादनांत बेदाण्याचा वापर केला जात असल्याने बेदाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे राज्यातून दर्जेदार बेदाणा निर्यातीसाठी मोठ्या संधी आहेत. त्यादृष्टीने शेतकरीही पुढाकार घेत आहेत.
- प्रतापसिंह चव्हाण, बेदाणा निर्यातदार
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातून निर्यातीचा आलेख वाढत असल्याने ही बाब चांगली आहे. गतवर्षी जगभरातील बाजारपेठेत दरही अपेक्षित मिळाले होते. यंदाच्या हंगामात निर्यात वाढेल असा अंदाज आहे.
- विजय पाटील, बेदाणा निर्यातदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT