Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Production Ban : महाराष्ट्र, कर्नाटकातील घटत्या साखर उत्पादनामुळेच इथेनॉलवर निर्बंध

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर उत्पादन कमी झाल्यानेच केंद्राला साखर व इथेनॉलबाबतचे उलटसुलट निर्णय घ्यावे लागत आहेत. देशाच्या साखर उद्योगात विशेष करून महाराष्ट्र व कर्नाटकातील घटते उत्पादन हा कळीचा मुद्दा ठरला आहे.

गेल्या दोन वर्षांतील साखर हंगामाच्या तुलनेत यंदा या दोन राज्यांत असणारी पिछाडीच केंद्राला पुरेशा साखर निर्मितीबाबत भयभीत करत आहे. साखर उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक यांचा वाटा मोठा आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्माने) दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीमध्ये १५ डिसेंबरअखेर उत्तर प्रदेशात २२ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत २० लाख टन साखर निर्मिती झाली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशामध्ये दोन लाख टनाने साखर उत्पादन जादा झाले आहे. ही आकडेवारी पाहता उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी इतकेच किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा थोडे अधिक साखर उत्पादन होईल अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रामध्ये १५ डिसेंबरअखेर २४ लाख टनाचे साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी या कालावधीत तब्बल ३३ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख टन साखर कमी तयार झाली आहे. महाराष्ट्रातील उसाची सध्याची स्थिती पाहता हा फरक हंगाम संपेपर्यंत कायम राहील अशी शक्यता आहे.

(ॲग्रो विशेष)

कर्नाटकातही १७ लाख टन साखर उत्पादन यंदा झाले आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन २० लाख टन इतके होते. दोन्ही राज्यांचा विचार करता दोन्ही राज्यांची एकत्रित तूट गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगाम संपेपर्यंत सुमारे १५ लाख टनांहून अधिक होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मात्र गेल्या वर्षी इतकेच किंबहुना थोडेसे अधिक साखर उत्पादन करेल असा अंदाज आहे.

तीन राज्यांत सुमारे ८० ते ८५ टक्के उत्पादन

पहिल्या तीन राज्यांतील उत्पादन देशाच्या एकूण उत्पादनाच्या जवळजवळ ८० ते ९५ टक्के असते. या तीनपैकी दोन राज्यांतील पिछाडी यंदा साखर कमी उत्पादित होईल हे दाखवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनातील झालेली ही घट केंद्राला इथेनॉल निर्मितीबाबत निर्णय घेण्यास भाग पाडत आहे.

१५ डिसेंबर अखेर देशात ७४ लाख टन साखर तयार झाली. यापैकी केवळ ९ लाख टन साखर या पहिल्या तीन राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यात तयार झाली. ६५ लाख टन साखर या तीन राज्यांनी तयार केली. यावरूनच या तीन राज्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात साखर तयार होते हे निदर्शनास येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT