Ethanol Production : इथेनॉल निर्मीतीवरील बंदीप्रकरणी केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

Sugarcane Factory : केंद्र सरकारने साखर, उसाचा रस आणि उपपदार्थापासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली होती.
Ethanol Production
Ethanol Productionagrowon
Published on
Updated on

Central Government Ethanol : केंद्र सरकारने साखर, उसाचा रस आणि उपपदार्थापासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली होती. या निर्णयाला साखर उद्योगातून होणारा विरोध पाहून केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे.

याबाबत केंद्रीय खाद्यसचिव संजीव चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गळीत हंगाम २०२३-२४ (ऑक्टोबर-नोव्हेंबर) मध्ये इथेनॉल निर्मितीसाठी १७ लाख टन साखरेच्या मर्यादीत उसाचा रस आणि बी-हेवी मळी वापरण्यास साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. मंत्री समितीने काल(ता.१५) घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

इथेनॉल निर्मीतीला केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर साखर कारखानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान २०२३-२४ च्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल बनविण्यासाठी उसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी-हेवी प्रतीची मळी या दोन्हींचाही वापर करण्याची परवानगी केंद्र सरकारने पुन्हा दिली. यामध्ये केंद्राकडून काही नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. साखरेची मर्यादा १७ लाख टन निश्चित करण्यात आली आहे.

लोकसभा डोळ्यासमोर ठेवून केंद्राने साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात होते. दरम्यान तेल कंपन्यांकडे झालेल्या करारानुसार यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ३० लाख टन साखर आणि जानेवारीपर्यंतचे ५ लाख टनाचे संभाव्य करार विचारात घेता एकूण ३५ लाख टन साखरेपासून इथेनॉलचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज होता

त्यातील १७ लाख साखर इथेनॉलकडे वळवण्यास परवानगी दिली आहे. म्हणजे यंदाच्या हंगामातील जी साखर इथेनॉलकडे जाणार होती त्यातील अजूनही निम्मी साखर देशाच्या बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Ethanol Production
Ethanol Production Ban : ‘सी हेवी मोलॅसीस’पासून इथेनॉलचा पर्याय शोधा

दरम्यान इथेनॉलवर घातलेल्या बंदीमुळे देशातील सर्वच शेतकरी संघटनां विरोधी पक्षातील नेत्यांसह शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता. यावर केंद्राने शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा आदेशात बदल करण्याचा निर्णय घेतला.

चोपडा यांनी सांगितले की, इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि बी- हेवी मळीच्या प्रमाणावर अजून विचार केला जात आहे. चालू हंगामात उसाच्या रसापासून आधीच काही इथेनॉलची निर्मिती करण्यात आली आहे.

बंदी आदेश जारी होण्याच्या आधीच ६ लाख टन इथेनॉलची निर्मिती कारखान्यांनी केली होती. सरकारच्या अंदाजानुसार, यंदा साखरेचे उत्पादन घटून ३.२ ते ३.३ कोटी टन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ३.७ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com