Ethanol Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Blending : भारतात पुढील वर्षीही इथेनॉल मिश्रणाचा वेग मंदावणार

Ethanol Production : भारताचे इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असले तरी नैसर्गिक परिस्थिती आणि कच्या मालातील उत्पादन घटीमुळे अपेक्षित इथेनॉल मिश्रण भारताला गाठण्यात अडचणी येत आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : भारताचे इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असले तरी नैसर्गिक परिस्थिती आणि कच्या मालातील उत्पादन घटीमुळे अपेक्षित इथेनॉल मिश्रण भारताला गाठण्यात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेच देशात इथेनॉल मिश्रणाचा वेग मंदावला आहे. परिस्‍थिती बदलली नाही तर भारत येणाऱ्या वर्षातही इथेनॉल मिश्रण गतीने करू शकणार नाही, अशी भीती अमेरिकेच्या फॉरेन ॲग्रिकल्चर सर्व्हिस या विभागाने वर्तविली आहे.

भारतासाठी जारी केलेल्या जैवइंधन वार्षिक अहवालात इथेनॉलची परिस्थिती स्पष्ट केली आहे. विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, भारतात यंदाच्या वर्षाअखेर पर्यंत ६०० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उसापासून इथेनॉल तयार करण्यास आलेले निर्बंध व तांदळापासून इथेनॉल करण्यावर बंदी घातल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घट अपेक्षित धरली आहे.

भारतात इथेनॉलचा वापर ७०० कोटी लिटरपर्यंत होईल. पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी ६२० कोटी लिटर इथेनॉल लागेल, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे. मागणीच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी होत असल्याने त्याचा परिणाम इथेनॉल मिश्रणावर होत आहे.

एप्रिल २०२३ मध्ये भारताने इथेनॉल मिश्रणाचा वेग अधिक होता. यानंतर मात्र वेग मंदावला. साखर उद्योगावर इथेनॉलसाठी मर्यादा घातली तेथूनच केंद्राच्या इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमावरही त्याचा परिणाम झाला. अशा निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीचा वेग कमी आहे. मक्याचे उत्‍पादनही घटले तसेच अनुदानित तांदळावरही बंदी घातली यामुळे साखर उद्योगाव्यतिरिक्त इतर शेतमालापासून तयार होणारे इथेनॉलही कमी उत्‍पादित झाले.

या सर्व घटकांचा परिणाम येणाऱ्या वर्षातही होण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे उद्दिष्टांइतके इथेनॉल मिश्रण करण्यात भारताला अपयश येऊ शकते. पाण्याच्या ताणामुळे तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, इथेनॉल उत्पादनासाठी तुटलेल्या तांदळाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अन्नधान्याचा साठा कमी होत आहे. या फीडस्टॉकची उपलब्धता मागील वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षासाठी अंदाजे २० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

कच्या मालातील उत्पादन घट

इथेनॉलसाठी मका उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नात आहे. एमएसपी वाढवून मका खरेदी करण्याचा प्रयत्न केंद्राचा आहे. भारताचे इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असले तरी नैसर्गिक परिस्थिती व कच्या मालातील उत्पादन घटीमुळे इथेनॉल मिश्रण भारताला गाठण्यात अडचणी येत असल्याचेही अहवालात म्हटले. आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT