Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : देशात रोज आठ लाख क्विंटल कापसाची आवक

Cotton Arrival : देशात सध्या रोज सात ते आठ लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. दीड लाख क्विंटल गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती रोज होत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात सध्या रोज सात ते आठ लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. दीड लाख क्विंटल गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती रोज होत आहे. खाद्य तेलांच्या बाजारात नरमाई आल्याने सरकी दरात काहीशी घट मागील १५ ते १६ दिवसांत झाली आहे.

कापसाचे दर खानदेशात खेडा किंवा थेट खरेदीत ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर्जा व शेतकऱ्यांकडील साठा यानुसार दर दिले जात आहेत. काही शेतकऱ्यांना ७१०० रुपये प्रतिक्विंटलचाही दर मिळाला आहे.

खानदेशात सध्या कापसाची आवक तुलनेत कमी आहे. खानदेशात रोज २० ते २१ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक खानदेशात बरी आहे. देशातही मागील वर्षाच्या तुलनेत कापसाची आवक अधिक आहे.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशात रोज दोन ते अडीच लाख क्विंटल कापसाची आवक होती. यंदा ही आवक अधिक आहे. कारण कापूस बाजार यंदाही सुरवातीपासून संथ व अस्थिर दिसत आहे.

सरकीचे दर मागील महिन्यात ३३०० रुपये प्रतिक्विंटल होते. सध्या सरकीचे दर ३१०० रुपये आहेत. खंडीचे दर (एक खंडी ३५६ किलो रुई) ५५ ते ५६ हजार रुपये असे आहेत. सरकी दरात घट झाल्याने कापूस बाजार ६८०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावरला आहे.

सरकीला खाद्यतेलाच्या बाजारात मागणी कमी आहे. सोयाबीन, मका यंदा मुबलक आहे. यामुळे पशुखाद्यासंबंधी सरकी ढेपेला चांगले व कमी दरातील पर्यायही बाजारात आहेत. यामुळे सरकीला उठाव कमी आहे.

कापूस महामंडळाचा आधार

देशात कापूस महामंडळ (सीसीआय) उत्तर भारतासह मध्य प्रदेश व तेलंगणात कापसाची बऱ्यापैकी खरेदी करीत आहे. ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा दर सीसीआय कापसाला सरसकट सध्या देत आहे. यामुळे बाजार काहीसा स्थिर दिसत आहे. शासकीय हस्तक्षेपामुळे बाजारातील पडझड कमी झाल्याचा मुद्दाही जाणकार उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Adulteration: खतांतील भेसळ रोखण्यासाठी जरबयुक्त कारवाई गरजेची

Rabi Season: हरभऱ्याची एक लाख १० हजार हेक्टरवर पेरणी

Gopal Ratna Awards 2025: राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर, कोल्हापूरचे अरविंद पाटील ठरले सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक, देशात पहिला क्रमांक

ATMA Scheme: ‘आत्मा’ योजनेसाठी ३५.७९ कोटींचा निधी मंजूर; कृषी विस्ताराला नवी गती मिळणार?

Soybean MSP Procurement: सोयाबीन विक्रीसाठी ११ हजारांवर शेतकऱ्यांची नोंद

SCROLL FOR NEXT