Sweet Orange Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sweet Orange : सूर्यप्रकाशाचा अभाव, सततच्या पावसामुळे वाढली फळगळ

सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव अन् मुळांची अकार्यक्षमता यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांची गळ वाढली आहे.

टीम ॲग्रोवन

जालना ः सततचा पाऊस (Continues Rain), सूर्यप्रकाशाचा अभाव (Lack Of Sunlight) अन् मुळांची अकार्यक्षमता यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांची गळ (Sweet Orange Fruit Fall) वाढली आहे. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मोसंबी संशोधन केंद्राचे (Sweet Orange Research Center) प्रमुख डॉ. संजय पाटील थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कार्ला, जि. जालना येथे मोसंबी उत्पादकांच्या (Sweet Orange Farmer) प्रक्षेत्रावरील कार्यशाळेत डॉ. पाटील बोलत होते.

मराठवाड्यात जवळपास ३० हजार हेक्टरवर उत्पादनक्षम मोसंबी बागा विस्तारल्या आहेत. औरंगाबाद जालना या दोन जिल्ह्यांत मोसंबीची क्षेत्र सर्वाधिक आहे. सततच्या व अति पावसाने एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असता मोसंबी या फळ पिकाची ही मोठ्या प्रमाणात आंबिया बहराची गळ होत असल्याची स्थिती आहे. कृषी विभाग आणि मोसंबी संशोधन केंद्रातर्फे कार्ला (ता. जालना) येथे बुधवारी (ता. १७) मोसंबी फळगळ कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, तालुका कृषी अधिकारी संतोष गाढे, मंडळ कृषी अधिकारी अजय सुखदेवे, माजी सभापती रमेश शिंदे, कृषिभूषण भगवान काळे आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी फळपीक अति पाण्यास संवेदनशील असून, सतत पडलेल्या पावसामुळे मुळांच्या परिसरात ओलावा जास्त झाला, मुळांची दमकोंडी झाल्याने मुळांच्या जवळ प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन कार्यक्षमता कमी झाली. त्यामुळे अन्नद्रव्यांच्या वहनात अडथळा निर्माण झाला, तसेच सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे प्रकाश - संश्‍लेषण क्रियेत अडथळा निर्माण झाल्याने फळगळ दिसून आली.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेल्या ठिकाणी जमीन शेवाळून बुरशीचा प्रकोप झाल्याने मगरी लागून गळ दिसून आली. याच्या नियंत्रणासाठी फोसेटील ए एल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड आदी बुरशीनाशकाची आळवणी केल्यास गळ थांबण्यास मदत मिळेल.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक संतोष कमाने यांनी तर आभार चेतन बोर्डे यांनी मानले. या वेळी मोसंबी बागायतदार अनिल देशमुख, शिवाजी गोरे, रामराव काळे, सखाराम कोल्हे आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT