Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : गणेशोत्सवानिमित्त फळे, फुलांना मागणी वाढली

Flower Rate : फूल आणि फळांना मागणी असणाऱ्या प्रमुख उत्सवांमधील गणेशोत्सवाला शनिवारपासून (ता. ७) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध फळे, फुलांना मागणी वाढली आहे.

Team Agrowon

Pune News : फूल आणि फळांना मागणी असणाऱ्या प्रमुख उत्सवांमधील गणेशोत्सवाला शनिवारपासून (ता. ७) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध फळे, फुलांना मागणी वाढली आहे. परिणामी, दरांत देखील वाढ झाली असून, दरांमध्ये चढ-उतार सुरू आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून फळे, फुलांची आवक वाढली आहे. यामध्ये गुलछडीला प्रतिकिलोला एक हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. मात्र शुक्रवारी दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी, गणेशोत्सव काळात दर कायम राहतील, असा अंदाज फूल आडतदार संघटेनेचे पदाधिकारी सागर भोसले यांनी व्यक्त केला.

गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक आणि घरगुती प्रतिष्ठापनेसाठी हार, पूजा आणि सजावटीच्या फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश फुलांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गौरी आगमन आणि गौरी भोजनादिवशी दरात आणखी वाढ होईल आणि दर टिकून राहतील. असे भोसले यांनी सांगितले.

फुलबाजारात गुलछडीच्या फुलाच्या दरात मोठी वाढ झाली. सततच्या पावसामुळे फुले भिजली असून, फुले काढण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे कमी प्रमाणात काढणी होत असल्याने आवक तुलनेने कमी आहे. तर गुलछडीचा वापर प्रामुख्याने हारांमध्ये होत असल्याने हार करणाऱ्या शहरातील, उपनगरांतील आणि जिल्ह्यांसह कोकणातील व्यावसायिकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, गुरुवारी (ता. ५) दर प्रतिकिलो १ हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र शुक्रवारी तुलनेते दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. परंतु उत्सवकाळात दरात पुन्हा वाढीचा अंदाज आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे दर

जुई १२००-१५००

गुलझडी ६५०-१४००

आर्केड ३००-५००

शेवंती १५०-२००

सुटा ॲस्टर १५०-२००

डच गुलाब १५०-२५०

जरबेरा ७०-१२०

झेंडू ४०-६०

गुलाब गड्डी ४०-८०

फळांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ

हरतालिका पूजन, गणेशोत्सव आणि गौरीपूजनानिमित्त विविध फळांच्या मागणीबरोबरच दरात वाढ झाल्याचे फळांचे व्यापारी आणि आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांनी सांगितले. विविध फळांमध्ये संत्रा, मोसंबी, केळी, पेरू, सीताफळ, सफरचंदाला मागणी वाढली आहे. यामुळे विविध फळांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT