Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

Monsoon rain News : कुंभी प्रकल्पाच्या विद्युत ग्रुहातुन ३०० तर चक्राकार दरवाजातून ४३७ असे एकूण ७३७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Kolhapur Rain
Kolhapur RainAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यात सोमवारी(ता.२८) पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात पाऊस सुरुच असल्याने नद्यांच्या पाणीपात्रात वाढ असली तरी वाढीची गती कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोदे धरण क्षेत्रात विक्रमी १८२ मिलिमीटर पाऊस झाला तर कुंभी धरण क्षेत्रात १५४ मिलिमीटर पाऊस झाला. कुंभी प्रकल्पाच्या विद्युत ग्रुहातुन ३०० तर चक्राकार दरवाजातून ४३७ असे एकूण ७३७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाणीपातळी कमालीची वाढली आहे. कुंभी धरणावरील रेव्याचीवाडी, पळसंबे, मांडुकली, वेतवडे व शेणवडे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Kolhapur Rain
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी

नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.वारणा (चांदोली) धरण ८५ टक्के भरले असून, येथील विसर्ग वाढवून तो १५ हजार ७५ क्युसेक सुरू ठेवण्यात आला. त्याचबरोबर सर्फनाला धरणातून सात हजार ७५ क्युसेक, घटप्रभातून सहा हजार क्युसेक, दुधगंगा धरणातून ३६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

याशिवाय आलमट्टी धरण ७९.२६ टक्के, तर कोयना धरण ८०.५४ टक्के भरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आठवडाभरातील संततधार आणि चांदोली धरणातून १५०७५ क्युसेकने पाणी सोडल्याने रविवारी चौथ्यांदा वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले.

Kolhapur Rain
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी चांदोली धरणातून वक्राकार दरवाजातून सुरू असणारा ११९०० क्युसेक विसर्ग वाढवून तो १३४५५ क्युसेक व विद्युतगृहातून चालू असणारा १६३० क्युसेक असा एकूण १५०७५ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. चिकुर्डे बंधारा, ऐतवडे - निलेवाडी पूलही पाण्याखाली आहे.

धरणांची स्थिती...

आलमट्टी धरण : ७९.२६ टक्के भरले

कोयना धरण : ८०.५४ टक्के भरले

पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या..

पंचगंगा नदीवरील : ७ बंधारे

वारणा नदीवरील : ८ बंधारे

भोगावती नदीवरील : ७ बंधारे

वेदगंगा नदीवरील : ५ बंधारे

कासारी नदीवरील : १० बंधारे

कुंभी नदीवरील : ६ बंधारे

कडवी नदीवरील : ५ बंधारे

घटप्रभा नदीवरील : ७ बंधारे

हिरण्यकेशी, धामणी आणि ताम्रपर्णी नदीवरील प्रत्येकी : ३ बंधारे

शाळी नदीवरील : १ बंधारे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com