Pomegranate
Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : डाळिंबाच्या मृग बहरावर पावसाने फेरले पाणी

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः राज्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका डाळिंबाला (Pomegranate Crop Damage) बसू लागला आहे. परिणामी बदलत्या तापमानामुळे मृग बहरातील डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव (Pomegranate Disease Outbreak) वाढला आहे. त्यातच कळी गळ, कळीचे सेटिंग (Banana) न होणे अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत. पाऊस असाच राहिला तर मृग बहरातील डाळिंबाचे नुकसान होऊन उत्पादनखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची स्थिती ‘बुडत्याचा पाय, आणखी खोलात’ अशी होण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा डाळिंबाचा मृग बहर सुमारे २० हजार हेक्टरवर आहे. वास्तविक पाहता, गेल्या तीन ते चार वर्षांपासून मृग बहरातील डाळिंबाला परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा या बहरातील डाळिंब क्षेत्रात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी, या हंगामातील डाळिंबाची निर्यात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी धाडस करून हा बहर साधला आहे. जून महिन्यापासूनच बहुतांश भागात पाऊस सुरु झाला. परंतु, या पावसामुळे डाळिंबावर फारसा परिणाम झाला नाही.

त्यातूनही डाळिंबाच्या फुलकळीची सेटिंग झाली. पेरुऐवढ्या आकाराची फळे लागली. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. ज्या भागात पाऊस कमी आहे, त्याठिकाणी डाळिंबाचे पीक चांगले आहे. अधूनमधून मोठा पाऊस, पावसाची रिमझिम, ढगाळ वातावरण या साऱ्याचा फटका डाळिंबाला बसू लागला आहे. डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ऑगस्टमधील फळांचे सेटिंगच नाही

शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात उशिरा तयारी करून मृग बहर धरला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. त्यातच पाऊस सुरु झाला. त्यामुळे वाफसा स्थितीअभावी डाळिंबाची पानगळ व्यवस्थित झाली नाही. परिणामी ऑगस्टमध्ये धरलेल्या बहरातील फळांची कळी निघण्यास अडचणी आल्या. त्यामुळे डाळिंबाचे सेटिंग झाले नाही. परिणामी या महिन्यात धरलेल्या बागा वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.

राजस्थान, गुजरातमधील बागा चांगल्या

राज्यस्थान, गुजरातमध्ये हस्त आणि अंबिया बहर धरला जातो. या दोन्ही राज्यातील डाळिंबाला सध्या पोषक असे वातावरण आहे, अशी माहिती डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली. या दोन्ही राज्यातील डाळिंब केवळ देशांतर्गत बाजारपेठेत विक्री होते. येथील डाळिंबाचा अपेक्षित दर्जा नसल्याने निर्यात होत नाही.

राज्यातील मृग बहरातील डाळिंबाला पावसाचे ग्रहण लागले आहे. त्यातच ऑगस्टमध्ये धरलेल्या बागांची पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पानगळ झाली नाही. कळी निघाली नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडला आहे.
बाळासाहेब देशमुख, संचालक, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT