Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापूस बाजाराकडून शेतकऱ्यांची निराशा

चालू आठवड्याची सुरुवात म्हणजेच सोमवारी कापसाचे एमसीएक्सवरील वायदे ३० हजार ६५८ रुपये प्रतिगाठीवर खुले झाले.

Team Agrowon

अनिल जाधव

पुणेः मागील आठवडाभर कापूस बाजारात (Cotton Market) चढ उतार राहीले. आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशी वाढ झाली होती. तर देशातील वायदे (Future Market) आणि बाजार समित्यांमध्ये दर नरमले होते. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी चालू आठवडा निराशा करणार ठरला. 

चालू आठवड्याची सुरुवात म्हणजेच सोमवारी कापसाचे एमसीएक्सवरील वायदे ३० हजार ६५८ रुपये प्रतिगाठीवर खुले झाले. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. क्विंलटमध्ये हा दर १८ हजार रुपये होतो. पण सोमवारीच वायदे तुटण्यास सुरुवात झाली. एकाच दिवसात वायदे २९ हजार ६१६ रुपयांवर आले. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर दर १७ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरले होते. म्हणजेच एकाच दिवसात कापसाचे वायदे ६०० रुपयाने कमी झाले होते.

मंगळवारीही वायद्यांमध्ये चढ उतार राहीले. मात्र बुधवारी पुन्हा वाढ होऊन वायद्यांनी ३० हजार ६५२ रुपये, म्हणजेच सोमवारची दरपातळी गाठली. पण बाजार या दरावर टिकला नाही. बुधवारपासून दरात पुन्हा घट होत गेली. गुरुवारीही कापूस वायदे कमी होत गेले. अखेर शुक्रवारी २९ हजार ९० रुपयांवर म्हणजेच १७ हजार १११ रुपये प्रतिक्विंटलवर बाजार बंद झाला. आठवड्याचा विचार करता वायद्यांमध्ये दर १ हजार ५६८ रुपयांनी नरमले.

चालू आठवड्यात बाजार समित्यांमध्येही कापूस दरात नरमाई पाहायला मिळाली. मात्र बाजारात आवक कमी असल्यानं दरातील घट मर्यादीत राहीली. आठवड्याच्या सुरुवातील म्हणजेच सोमवारी देशातील कापसाला सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपये दर मिळत होता. मात्र आठवडाभर दरात काहीसे चढ उतार होत शनिवारी बाजार समित्यांमध्ये कापसाला ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. म्हणजेच या आठवड्यात कापसाच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घट झाली.

…………….
आंतरराष्ट्रीय बाजारातील चित्र
चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सुधारले. सोमवारी बाजार ८२.२५ सेंट प्रतिपाऊंडवर म्हणजेच १४ हजार ९८० रुपये प्रतिक्विंटलवर सुरु झाला होता. मात्र सोमवारपासूनच कापूस दरात चढ उतार सुरु झाले. बुधवारी कापसाने ८९ सेंटचा टप्पा गाठला. क्विंटलमध्ये हा दर १६ हजार ३९१ रुपये होतो. मात्र त्यानंतर पुन्हा दरात चढ उतार होत राहीले. अखेर शुक्रवारी ८५.१७ सेंटवर म्हणजेच १५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर बाजार बंद झाला. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय वायदे ५२० रुपयाने वाढले होते.

…………..
बाजाराचे लक्ष कोरोनाकडे
एकूणच काय तर, चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे वाढले. मात्र देशातील वायद्यांमध्ये दर घटले होते. चीनमध्ये वाढलेला कोरोना आणि कापूस वापर घटण्याचे अंदाज, याचा कापूस बाजारावर परिणाम जाणवला. आता पुढील आठवड्यातही कापूस बाजारात संमिश्र स्थिती राहण्याचा अंदाज आहे. पण देशातील कापूस दर आणखी कमी होण्याची शक्यता नाही. मात्र कोरोनाचा विळखा वाढतो की सैल होतो यावर कापूस बाजाराचे चित्र अवलंबून असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT