Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Rate : देवगड हापूसला मिळाली थेट अमरावती बाजारपेठ

Mango Market : देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील शेतकऱ्याला थेट अमरावती बाजारपेठेत हापूस विक्रीची परवानगी देत शेतकरी ते ग्राहक उपक्रमाला बळ देण्याचा प्रयत्न अमरावती बाजार समितीकडून करण्यात आला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील शेतकऱ्याला थेट अमरावती बाजारपेठेत हापूस विक्रीची परवानगी देत शेतकरी ते ग्राहक उपक्रमाला बळ देण्याचा प्रयत्न अमरावती बाजार समितीकडून करण्यात आला. याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षीपासून आंबा महोत्सव घेण्याचा मनोदय बाजार समिती सचिव दीपक विजयकर यांनी व्यक्‍त केला.

अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर हे गुलटेकडी (पुणे) स्थित कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी पणन मंडळाच्या खालील बाजूस आंबा महोत्सव सुरू असल्याने त्यांनी आंबा महोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर जात माहिती घेतली. राज्याच्या विविध भागातील आंब्याची उपलब्धता या ठिकाणी करण्यात आली होती.

या आंबा फळांना ग्राहकांची देखील चांगली मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दरम्यान देवगड येथील संकेत पुजारी या युवा शेतकऱ्याशी दीपक विजयकर यांनी संवाद साधला. संवादादरम्यान संकेत पुजारी यांनी हापूस विक्रीसाठी अमरावती बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

युवा शेतकऱ्याच्या या हाकेला श्री. विजयकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत त्यास अमरावती बाजार समितीच्या परिसरात स्टॉल लावण्यास सांगितले. त्यानुसार संकेत पुजारी यांनी देखील पुण्यातील आंबा महोत्सव संपताच अमरावती गाठले.

बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच त्यांनी देवगड हापूस विक्रीचा स्टॉल लावला. याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे संकेत यांनी सांगितले.

युवा शेतकऱ्याने देवगड हापूस विक्रीसाठी जागा उपलब्धतेची मागणी केली होती. त्यानुसार स्टॉलकरिता जागा देण्यात आली. या उपक्रमाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी आंबा महोत्सव उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मकता आहे.
- दीपक विजयकर, सचिव, बाजार समिती, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दरात काहिशी सुधारणा; सोयाबीन स्थिरावले, गाजराला उठाव, जांभूळ दर टिकून तर टोमॅटो आवक कमी

Monsoon Alert: माॅन्सूनचा ६ व्या दिवशीही मुक्काम; विदर्भात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज

Dam Water level Drop: खानदेशातील धरणांतील जलसाठा घटला

Crop Damage Compensation Demand: वादळग्रस्त केळी उत्पादकांना तातडीची मदत द्या : किरण चव्हाण

Banana Crop Damage: वादळी वाऱ्याने केळी बाग उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT