Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market: कांदा टंचाई असूनही सरकारच्या दबावामुळे भाव कमी; भावपातळी अपेक्षेपेक्षा कमीच

Onion Rate : कांद्याला किमान ५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळालायला हवा. पण बाजारात ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

अनिल जाधव

Pune News : खरिपातील कांदा उत्पादन घटलं. बाजारातील आवकही कमी आहे. असं असतानाही कांद्याचा बाजार अपेक्षितरित्या वाढलेला नाही. या परिस्थितीत कांद्याला किमान ५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळालायला हवा. पण बाजारात ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे. सरकारने कांदा बाजारावर मानसिक दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे कांदा बाजार दबावात आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

सध्या बाजारात जुन्या म्हणजेच उन्हाळ कांद्याला ३ हजार ३०० ते ३ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर लाल कांद्याचा बाजार ३ हजार ५०० रुपयांपासून ४ हजार २०० रुपयांपर्यंत आहे. पण बाजारातील आवक मात्र मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे कांद्याचा भाव यापेक्षा जास्त असायला हवा. पण सरकारच्या सायकाॅलाॅजिकल दबावामुळे बाजारात हा भाव मिळतोय.

मग सरकार कोणता सायकाॅलाॅजिकल गेम खेळतंय. तर सरकारने नाफेडच्या खरेदीचा गेम खेळला. आणि ठिकाण आहे राजस्थान. नाफेड आता राजस्थानमध्ये कांदा खेरदी करत आहे. कारण यंदा लाल कांद्याचं उत्पादन राजस्थानमध्ये बऱ्यापैकी आहे. कांद्याची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे सध्या राजस्थानमध्ये कांदा भाव ३ हजारांपासून ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

नाफेड राजस्थानच्या बाजारातून कांदा खरेदी करत आहे. हा कांदा ग्राहकांना स्वस्त भावात उपलब्ध करून दिला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार राजस्थानमध्ये सरकार बाजारभावाने कांदा खेरदी करत आहे. आणि हा कांदा शहरांमधील ग्राहकांना स्वस्त उपलब्ध करून दिला जात आहे. सरकार येथे तोटा सहन करत आहे.

आता सरकारच जास्त भावाने खरेदी करून स्वस्त विकतं म्हटल्यावर खासगी व्यापारी जास्त भाव कसे देणार? खासगी व्यापारीही परवडेल त्या भावात कांदा विकतील. आता सरकारची खरेदी काही जास्त नाही. पण सरकारने सायकाॅलाॅजिकल दबाव तयार केला.

दुसरं म्हणजे सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डाॅलर केले. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला. सध्या देशातच पुरवठा कमी असल्याने निर्यातीचा तेवढा प्रश्न नाही. पण याचाही बाजारावर सायकाॅलाॅजिकल दबाव आहे. सध्याच्या स्थितीत निर्यात सुरु असती तर कांदा बाजाराला आणखी आधार मिळाला असता.

राज्यातील बाजारात सध्या बाजारात उन्हाळ कांद्याची आवक जास्त आहे. उन्हाळ कांदा डिसेंबरच्या मध्यानंतर बाजारात येणार नाही. तर सध्या राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात लाल कांद्याची आवक सुरु झाली. यंदा राजस्थान आणि गुजरातमध्ये कांद्याचे उत्पादन आणि गुणवत्ता जास्त आहे. पण इतर राज्यांमध्ये अडचणी आहेत. उत्पादन कमी असूनही केवळ सरकारच्या आशिर्वादाने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार बाजारातून जास्त भावात कांदा खरेदी करून ग्राहकांना स्वस्त दरात कांदा देते. म्हणजेच सरकार ग्राहकांसाठी तोटा सहन करते. पण जेव्हा एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला अगदी एक रुपयापासून भाव मिळत होता तेव्हा सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही. सरकारच्या अशा दुटप्पी धोरणावरून मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT