Tur rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : आयात वाढूनही तूर तेजीतच

देशात आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या दरावर काहीसा दबाव येण्याची शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत.

अनिल जाधव

पुणेः देशात सध्या तुरीची टंचाई (Tur Shortage) असल्याने आयात वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात आफ्रिका आणि म्यानमारमधून जवळपास ९५ हजार टन तूर आयात (Tur Import) झाली. मात्र देशात मागणी (Tur Demand) असल्याने दर तेजीत आहेत.

देशात आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या दरावर काहीसा दबाव येण्याची शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. आयातदारांच्या मते ऑक्टोबर महिन्यात देशात तब्बल ९५ हजार टन तूर आयात झाली.

एवढ्या प्रमाणात प्रमाणात तूर आयात झाली तरी बंदरांवर तुरीचा साठा नाही. कारण देशात तुरीची टंचाई असल्याने मिलर्स लगेच तुरीची उचल करत आहेत. तसेच सरकारही आयात तुरीची खरेदी करत आहे.

सध्या महिन्याला एक लाख टन तूर आयात होत असली तरी हातोहात मालाचा निपटारा होत आहे. त्यामुळे तुरीचे दर कमी होण्याची शक्यता नाही. डिसेंबरच्या मध्यापासून कर्नाटकात काही ठिाकणी नव्या तुरीची आवक सुरु होईल.

मात्र बाजारात आवकेचा दबाव जानेवारीपासून येण्यास सुरुवात होईल. पण यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा ऐन हंगामातही तुरीच्या दरावर मोठा दबाव येण्याची शक्यता कमीच आहे, असं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

कोणत्या देशातून किती आयात?

देशात ऑक्टोबर महिन्यात ९५ हजार २१९ टन तुरीची आयात झाली. यापैकी तब्बल ८५ टक्के तूर आफ्रिकेतील मोझांबिक, सुदान, मालावी आणि टंझानिया या देशांमधून झाली. तर १४.५ टक्के आयात म्यानमारमधून झाली.

यापैकी टंझानियामधून ३० हजार ११७ टन आयात झाली. तर मोझांबिकमधून २८ हजार ५५ टन तूर देशात आली. सुदान या देशातून ११ हजार ४९२ टन तर मालावी देशातून ११ हजार ७५४ टन तूर देशात आयात झाली. आफ्रिकेतील यार देशांमधून ऑक्टोबर महिन्यात ८१ हजार ४२० टन तूर आयात झाली. तर म्यानमार या देशातून १३ हजार ७९९ टनांची आयात झाली.

दरपातळी काय?

सध्या देशातील बाजारात तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्यानं सरकारने तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: राज्यात उन्हाचा चटका कायम; काही ठिकाणी पावसाची शक्यता

Amravati Fruit Market: संत्री, मोसंबीचीही नियमित आवक, सीताफळाची आवक ६८० क्विंटलवर; डाळिंबाला सर्वाधिक दर

Land Acquisition: जमीन संपादित करा, पण योग्य मोबदला द्या, सेलू तालुक्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांचे निवेदन

Karnataka Drought: कर्नाटकात दुष्काळामुळे ७० हजार कोटींचे पीक नुकसान, केंद्राच्या मदतीची मागणी

Farmer Loan Waiver List: शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या गावाच्या यादीत

SCROLL FOR NEXT