
पुणेः देशातील बाजारात सध्या तुरीचा तुटवडा (Tur Shortage) जाणवत आहे. त्यामुळे दरही तेजीत (Tur Rate) आहेत. तुरीच्या दरात मागील दोन महिन्यांपासून २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी दिसत आहे. मात्र सध्या मोठ्या मंदीची शक्यता दिसत नाही. तुरीचे दर (Tur Market Rate) ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
देशातील तूर बाजार सध्या तेजीत आहे. तुरीसाठी केंद्र सरकारने यंदा ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या तुरीचे किमान दर ६ हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला सध्या ६ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. मात्र आफ्रिकेच्या तुरीचे म्यानमार आणि देशातील तुरीपेक्षा कमीच नेहमी कमीच असतात. असं असूनही देशातील तुरीलाच जास्त भाव मिळत असतो.
देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवत आहे. तर दर वाढत असल्याने स्टाॅकिस्टही हळूहळू तूर बाजारात आणत आहेत. स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांकडेही सध्या तुरीचा कमी साठा आहे. परिणामी देशात तुरीचे दर वाढले. त्यामुळं आफ्रिकी देशातून तूर आयात वाढत आहे. मात्र तरीही तुरीच्या दरातील तजी कायम आहे.
मागील दोन महिन्यांपासून तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळत आहे. मात्र दरात फार मोठी मंदी येत नाही. तुरीचे कमाल दर ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आल्यानंतर तुरीला उठाव मिळतो. प्रक्रियादारांकेड डाळीलाही मागणी येते. तर तुरीच्या कमाल दरानं ८ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर मागणी काहीशी कमी होऊन दर पुन्हा नरमतात.
मात्र मागील दोन महिन्यांत तुरीचा सरासरी दर ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान राहीला. खालच्या पातळीवरून तरीला लगेच आधार मिळतो. त्यामुळे दर पुन्हा पुर्वपातळीवर येतात. सध्या आफ्रिकेतून तूर आयात काहीशी जास्त होते. ही तूर प्रक्रियेसाठी ततकी योग्य नसते. प्रक्रिया करताना या तुरीतून चुरा जास्त निघतो.
याचा तोटा प्रक्रियादारांना सहन करावा लागतो. त्यामुळे या तुरीला मागणीही कमी राहते. त्यामुळे या तुरीचे दरही कमी असतात. पण म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे दर जास्त आहेत. भारतातील तुरीलाही चांगली मागणी असते. त्यामुळे या दोन्ही तुरीचे दर तेजीत आहेत.
मागील आठवड्याचा विचार करता तुरीच्या भागात तेजीमंदी राहिली. दिवाळीनंतर तुरीला काहीसा कमी उठाव मिळतोय. पण देशात यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. आयात तुरीतूनही गरज पूर्ण होणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन देशात तुरीचे व्यवहार होत आहेत. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. देशातील नवी तूर डिसेंबरपासून येण्यास सुरुवात होईल. मात्र गुणवत्तापूर्ण नव्या मालालाही चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज तूर प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.