Jaggry Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : गुळाला मागणी स्थिर; दरात काहीशी घट

Kolhapur Jaggery Rate : सध्या येथील बाजारपेठेत गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. आवक वाढल्‍याने दर क्विंटलला १०० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत.

Raj Chougule

Kolhapur News : सध्या येथील बाजारपेठेत गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. आवक वाढल्‍याने दर क्विंटलला १०० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. दर कमी असले तरी श्रावणाच्या पार्श्‍वभूमीवर दर फारसे घसरणार नाहीत अशी शक्यता आहे. सध्या गुजरातमधील व्यापाऱ्यांची शीतगृहे रिकामी झाल्याने गुळाला रोजची मागणी आहे.

येणाऱ्या कालावधीत खरेदीत वाढ होण्‍याची शक्‍यता असल्याने गुळाचे दर क्विंटलला ४००० रुपयांच्या वरच राहतील, अशी शक्यता आहे. सध्‍या बाजार समितीत दररोज सुमारे ७००० रव्यांची आवक होत आहे. सध्या पावसाचा अडथळा नसल्‍याने गूळनिर्मिती दररोज सुरू आहे. यामुळे गुळाच्या आवकेत वाढ होत असल्‍याचे बाजार समितीच्‍या सूत्रांनी सांगितले.

जुलैच्या उत्तरार्धात पाऊस सुरू झाल्याने गुळाची आवक एकदम कमी झाली होती. सध्‍या नियमित हंगाम नसल्‍याने मार्चपासून गूळ सौदे एक दिवसाआडच होत आहेत. जुलैमध्ये ४००० ते ५००० गूळ रवे बाजार समितीत येत होते. गुळाची आवक कमी झाल्‍याने दरातही वाढ होती. या कालावधीत गुळाचे दर ४३०० रुपयांपर्यंत गेले होते. ऑगस्टच्या उत्तरार्धापासून मात्र परिस्थिती बदलली. ऊन पडल्‍याने गुऱ्हाळे सुरू करण्यासाठी पोषक हवामान तयार झाले.

यामुळे बंद असलेली काही गुऱ्हाळेही सुरू झाली. गुळाच्या आवकेत हळूहळू वाढ होत राहिली. मागणी स्थिरच असल्‍याने गेल्या पंधरा दिवसांत दरात क्विंटलला १०० ते २०० रुपयांची घसरण झाली. सध्‍या वाढीव नसली तरी श्रावणामुळे दररोजची मागणी आहे. यामुळे खरेदी केलेला गूळ तातडीने गुजरातला जात आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाच्या पाश्‍वर्भूमीवर स्थानिक मागणी वाढेल असा अंदाज आहे. यामुळे गूळ दराची विशेष घसरण होणार नाही, अशी शक्यता आहे.

सध्या गुजरातमधील ९५ टक्क्यांहून अधिक शीतगृहे रिकामी झाली आहेत. पंधरवड्यापूर्वी सणांच्या पार्श्‍वभूमीवर तेथील व्‍यापाऱ्यांनी शीतगृहातील सगळ्या गुळाची विक्री केली. यामुळे व्यापाऱ्यांना गुळाची गरज लागत आहे. कोल्हापूरबरोबर कर्नाटकातूनही गुळाची उपलब्धता व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नियमित मागणी असल्याने गूळ दर फार कमी होतील ही शक्यता सध्‍या तरी नसल्याचे गूळ उद्योगातून सांगण्यात आले.

२ सप्‍टेंबरची गुळाची स्थिती अशी (दर प्रति क्विंटल, रुपये)

गूळ प्रत कमीत कमी ते जास्तीत जास्‍त सरासरी

२ ४२०० ते ४४०० ४३००

३ ३७५० ते ४९९० ३९००

४ ३५७० ते ३७४० ३६५०

१ किलो ३७०० ते ४३०० ४०००

सध्‍या बाजारपेठेत गुळाची आवक काहीशी वाढली आहे. दर थोडे कमी झाले असले तरी दररोजची मागणी आहे. गूळ खरेदीसाठी आणखी काही व्यापारी सहभाग घेण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत गूळ विक्री जलद गतीने व वाढीव दराने होऊ शकते.
- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT