Jaggery Market : गुळाचे दर नरमले

Kolhapur Jaggery Market : पावसामुळे गुळाचा दर्जा चांगला ठेवण्‍यासाठी गुऱ्हाळ मालकांना झगडावे लागत आहे. परिणामी गुळाचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत क्‍विंटलला सुमारे दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत.
Jaggery Market
Jaggery MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्याच्‍या पश्‍चिम भागात पावसाची संततधार असूनही अद्याप गुऱ्‍हाळे सुरू आहेत. पावसामुळे गुळाचा दर्जा चांगला ठेवण्‍यासाठी गुऱ्हाळ मालकांना झगडावे लागत आहे.

परिणामी गुळाचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत क्‍विंटलला सुमारे दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत. गुळाची एक दिवसाआड २ ते ३ हजार रव्यांची आवक होत आहे. गुळास क्‍विंटलला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळत आहेत. एक किलो व दहा, तीस किलोच्या परिमाणात गूळ रवे बाजार समितीत येत आहेत.

गुजरातमधील व्यापाऱ्यांनीही शीतगृहातील गूळ विक्रीस काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे सध्या तयार होणाऱ्या गुळास अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. सध्‍या येथील गूळ बाजारात एक दिवसाआड गुळाची आवक होत आहे. पाऊस होत असला तरी भर पावसातच गुळाचे सौदे सुरू आहेत.

सध्‍याच्या हवामानामुळे शेतकऱ्यांचा गूळ शिल्लक राहून नुकसान होऊ नये यासाठी आम्‍ही पावसाचा विचार न करता सौदे काढत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. खरेदी केलेला गूळ तातडीने पॅक करून तो गुजरातला पाठविण्‍यासाठीही गडबड सुरू आहे.

Jaggery Market
Jaggery Market : हंगामाच्या शेवटी गूळ दरात वाढ

सध्या पडणारा पाऊस व ढगाळ हवामान गूळ साठवणुकीसाठी फारसे पोषक नाही. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून बारमाही गुळाची प्रथा सुरू झाली. जिल्‍ह्यातील वीस ते पंचवीस गुऱ्हाळे पावसाळ्यातही सुरू असतात. ज्या भागात पाऊस नाही त्या भागातील ऊस आणून त्याचा गूळ करण्‍याचे प्रयत्न सुरू आहेत.

Jaggery Market
Jaggery Market : बिगर हंगामी गुळास समाधानकारक दर

बाजार समितीतही व्यापारी हंगाम संपल्यानंतरचा गूळ घेण्यास तयार असल्याने रिमझिम पाऊस सुरू असतानादेखील गूळ उत्‍पादन सुरू आहे. अनेक गुऱ्हाळमालक गुळासाठी शिरोळ व हातकणंगलेबरोबरच राधानगरी, गगनबाबडा भागांतूनही उसाची खरेदी करून गूळनिर्मिती करत आहेत.

गूळ पट्ट्यातून उसाची उपलब्धता कमी

सध्‍या गूळ पट्ट्यातून उसाची उपलब्धता कमी आहे. सध्‍या गुजरातमधील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी शीतगृहातील गूळ बाहेर काढला आहे. येत्या दोन महिन्यात नवा हंगाम सुरू होणार असल्याने व्यापाऱ्‍यांनी शिल्लक गूळ संपविण्याला प्राधान्य दिले. परिणामी गुळाच्या खरेदीत काहीशी शिथिलता आली आहे. खरेदी कमी असली तरी खरेदी करणे सुरू आहे. यामुळे उत्पादित गुळाचे सौदे सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com