Urad Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Urad Production : पावसाच्या खंडामुळे उडदाच्या उत्पादकतेत घट

Urad Market : गेल्या आठवड्यातील काही दिवस उडदाचे किमान दर आधारभूत किंमत दर (प्रतिक्विंटल ६९५० रुपये) पेक्षा कमी राहिले आहेत.

माणिक रासवे

Hingoli News : गेल्या आठवड्यातील काही दिवस उडदाचे किमान दर आधारभूत किंमत दर (प्रतिक्विंटल ६९५० रुपये) पेक्षा कमी राहिले आहेत. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाच्या खंडामुळे उत्पादकता घटली आहे. त्यामुळे धान्य बाजारांतील उडदाची आवक कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उडदाच्या पेऱ्यातील घट यंदाही कायम आहे. यावर्षी ४ हजार १५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून स्थानिक परिसरातून हिंगोली धान्य बाजारात उडदाची आवक सुरु आहे.

गेल्या आठवड्यात प्रतिदिन ४ ते १५ क्विंटल दरम्यान मिळून एकूण ५४ क्विंटल आवक राहिली. गुरुवारी (ता. १२) उडदाची ४ क्विटंल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८०० ते कमाल ४००० रुपये तर सरासरी ३९०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.११) उडदाची ६ क्विटंल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७८२५ रुपये तर सरासरी ७३६२ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता.१०) १३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७७५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.९) १५ क्विंटल आवक होऊन किमान ६५०० ते कमाल ७५१० रुपये तर सरासरी ६९५५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१७) ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६९५० ते कमाल ७८५० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.

दर ६७०० ते ७००५ रुपये क्विंटल

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भूसारमाल मार्केट) शुक्रवारी (ता. १३) उडदाची १० क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटल किमान ६७०० ते कमाल ७००५ रुपये तर सरासरी ६ हजार ८५२ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT