Urad Production : एका एकरात यंदा उडदाचे केवळ एक क्विंटल उत्पन्न

Pulses Market : पावसाळ्यात पुरेसा पाऊस नसतानाही पेरणी केली. त्यात ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने महिनाभर खंड दिला.
Urad
UradAgrowon
Published on
Updated on

Nagar News : पावसाळ्यात पुरेसा पाऊस नसतानाही पेरणी केली. त्यात ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने महिनाभर खंड दिला. त्याचा मोठा फटका उडीद उत्पादनाला बसला आहे. नगर जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून उडदाचे पीक उत्पादन निश्चित झाले. जिल्ह्यात हेक्टरी २१७ किलो उत्पादन आल्याने एकरी उत्पादन एक क्विंटलच्या आतच आहे. केवळ नगर तालुक्यात काही प्रमाणात उत्पादन बरे आहे.

राज्यात यंदा सर्वाधिक सोलापूरला सर्वाधिक ५० हजार ७४६ हेक्टरवर तर त्या पाठोपाठ नगर जिल्ह्यात ४९ हजार ६४८ हेक्टरवर उडदाची लागवड झाली. बीड, उस्मानाबाद, सांगली, जालना, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत उडदाचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. राज्यात उडदाचे सरासरी ३ लाख ७० हजार २५२ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ३ लाख ५८ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.

Urad
Urad Harvesting : खानदेशात उडीद मळणीत पावसाने व्यत्यय

तर यंदा २ लाख ५६ हजार २१५ हेक्टरवर लागवड झाली. यंदा राज्यात बहुतांश भागात सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. राज्यात एक लाख हेक्टरने, तर नगर जिल्ह्यात १८ हजार हेक्टरने क्षेत्रात घट झाली. पेरणीनंतही पावसाने एक ते सव्वा महिना खंड दिला. त्यामुळे शेंगा भरण्याच्या काळातच उडदाला फटका बसला.

Urad
Moong Urad Sowing : अनिश्‍चित पाऊसमानामुळे मूग-उडदाचे क्षेत्र घटले

त्याचा परिणाम उत्पादन घटीवर होणार असल्याचे स्पष्ट दिसत होते. नगर जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात यंदा सरासरी उडदाचे हेक्टरी २१७ किलो म्हणजे एकरी ८६ किलो उत्पादन निघाले आहे. नगर तालुक्यात मात्र काही प्रमाणात अधिक म्हणजे एकरी २ क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले आहे.

सर्वेक्षणात आधीच स्पष्ट

नगर जिल्ह्यात पावसाने खंड दिल्यामुळे उडीद, मूग, सोयाबीनसह अन्य पिकांना फटका बसला. अधिक क्षेत्र असलेल्या प्रमुख मंडळातील पाच टक्के क्षेत्राचा प्रशासनाने सर्वे केला. त्यात मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्के घट होणार असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने शासनाला अहवाल दिलेला असून, पीकविमा कंपन्यांनीही एकवीस दिवसांपेक्षा अधिक खंड झाला असल्याने पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे महिनाभरापूर्वीच दिले होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता उडदाच्या उत्पादनात ७० ते ८० टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com