Soybean and Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Tur Rate : बाजार समित्यांत सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण

Market Update : बाजारपेठेत सोयाबीनचा किमान दर चार हजारांच्या आत पोचला असतानाच गेले अनेक दिवस १० हजारांवर विकत असलेली तूरचे दरही घसरले आहेत.

Team Agrowon

Akola News : बाजारपेठेत सोयाबीनचा किमान दर चार हजारांच्या आत पोचला असतानाच गेले अनेक दिवस १० हजारांवर विकत असलेली तूरचे दरही घसरले आहेत. बाजार समित्यांमध्ये तुरीचा सरासरी दर १० हजारांच्या आत उतरला आहे. काही ठिकाणी ९५०० पर्यंत दर मिळतो आहे.

नव्या हंगामाची सोयाबीन बाजारात येत असून विविध बाजार समित्यांमध्ये आवकेत मोठी वाढ झालेली आहे. सोयाबीनचा किमान दर चार हजारांपेक्षा कमी आहे. कमाल दरही ४६०० पर्यंत असला तरी सर्वच मालाला हा दर मिळत नाही. येथील बाजार समितीत सोयाबीन ४४०० पर्यंत सरासरी जात आहे.

हमीभावापेक्षा हा दर कमी आहे. सोबतच बाजारात आता तुरीच्या दरात झालेली घसरण चिंता वाढवणारी आहे. येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. ८) तूर किमान ८५०० व कमाल १०,४७५ रुपये विकली. सरासरी दर ९८०० रुपये होता. आजवर तुरीचा सरासरी दर १० हजारांवर होता. काही महिन्यांपूर्वी तुरीचा दर ११ हजारांवर पोचला होता. नंतर कमी होत आता ९५०० हजारांपर्यंत आला आहे.

आठवडाभरात तुरीच्या दरात साधारणतः ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. गेले वर्षभर मिळालेले दर यंदाही टिकून राहतील, चांगले दर मिळणार असल्याची शक्यता पाहत शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड वाढवली आहे. सर्वच जिल्ह्यांत तुरीची लागवड यंदा समाधानकारक झालेली आहे.

राज्यात तुरीची १२ लाख २३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात यंदा सरासरी ५५,५०८ हेक्टरच्या तुलनेत ६२,०७६, बुलडाण्यात ७९,२०८ हेक्टरच्या तुलनेत ८८,८०३ तर वाशीम जिल्ह्यात ५८,६१० हेक्टरच्या तुलनेत ६६,४३६ हेक्टरवर तुरीची लागवड झालेली आहे. या तिनही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी झालेली आहे. आता तुरीचा हंगाम दीड-दोन महिन्यांवर आलेला आहे. सध्या बाजारात मागील हंगामातील तूर येत आहे. नवीन तूर बाजारात दाखल झाल्यानंतर हा दर किती राहतो हे पुढील काळातच स्पष्ट होऊ शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT