Cotton Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : कापूस, मूग, सोयाबीनच्या किमतीत घसरण

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ३ ते ९ ऑगस्ट २०२४

पावसामुळे सर्वच शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाली. या सप्ताहात कापूस, मूग व सोयाबीन यांच्या किमती उतरल्या. सोयाबीनच्या किमतीनी ऑक्टोबर २०२३ नंतर नीचांकी पातळी गाठली आहे. टोमॅटोच्या किमतीसुद्धा वाढत्या आवकेमुळे घसरल्या आहेत.

सोयाबीनच्या जागतिक बाजारातील किमती वाढत्या उत्पादनामुळे मे २०२२ पासून घसरत आहेत. या वर्षीसुद्धा (२०२४-२५ मध्ये) जागतिक पुरवठा व वर्ष-अखेर साठा वाढण्याचा अंदाज आहे.

सोयाबीन तेल आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. एकूण खाद्य तेलाच्या आयातीत सोयाबीन तेलाचे प्रमाण ३० टक्के आहे. मुख्यत्वे ही आयात अर्जेंटिना (७५ टक्के) व ब्राझील (१४ टक्के) या देशांतून होते. सोयाबीनचे जागतिक उत्पादन २०२३-२४ मध्ये ३९५ दशलक्ष टन, तर २०२४-२५ मध्ये ४२२ दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. या वर्षी जागतिक किमतीत वाढ होण्याची शक्यता फारशी नसेल.

९ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. ५७,०२० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.८ टक्क्याने घसरून रु. ५६,५०० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ५६,३०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. १,४९२ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२५ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५७४ आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. २,४८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. २,५५० वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,५७१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. २,६०२ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांनी अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. या वर्षासाठी हमीभाव रु. २,२२५ आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १६,२३७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्याने घसरून रु. १६,२०२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. १६,३९६ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १७,०२६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ५ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ६,९२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी वाढून रु. ७,१०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.१ टक्क्यांनी घसरून रु. ८,२१३ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.४ टक्क्याने घसरून रु. ४,३८१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे; गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीन रु. ४६४६ वर आला होता, त्यानंतर एक महिना किमती वाढत त्यांनी रु. ५,३०१ ची पातळी गाठली. नंतर मात्र त्या सतत उतरत आहेत. या सप्ताहातील किंमत ही त्यानंतरची सर्वांत कमी किंमत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,०८३ वर आली होती. या सप्ताहात ती १.५ टक्क्याने वाढून रु. १०,२३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,७१३ होती; या सप्ताहात ती रु. २,९६३ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,३३३ वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. २,००० वर आली आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT