Turmeric Market : नव्या हंगामात हळदीचे दर दबावात राहण्याची शक्यता

Turmeric Rate : गेल्या काही वर्षांत १४ ते १५ हजार रुपये क्‍विंटलने हळदीचे व्यवहार होत असतानाच येत्या हंगामात मात्र हळदीचे दर काहीसे दबावात राहण्याची शक्‍यता शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
Turmeric
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : चांगला परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांव्दारे हळद लागवडीवर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांत १४ ते १५ हजार रुपये क्‍विंटलने हळदीचे व्यवहार होत असतानाच येत्या हंगामात मात्र हळदीचे दर काहीसे दबावात राहण्याची शक्‍यता शेतकरी, व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. मात्र हे दर सध्याच्या दराच्या आसपास राहतील, असेही सांगण्यात आले.

२०१० मध्ये हळदीच्या दरात चांगलीच तेजी आल्याने दुसऱ्याचवर्षी हळदीखालील क्षेत्रात दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणे दरावर झाला आणि दर चांगलेच घसरत १७ हजार रुपयांवरून अवघ्या पाच हजार रुपयांवर आले. या अनुभवातून काहीसा धडा घेत त्यापुढील काळात लागवड क्षेत्र कमी झाले.

Turmeric
Turmeric Market: हळदीचा बाजार नरमला

त्यामुळे हळदीचे दर गेल्या काही वर्षांपासून दहा हजारांच्या कमी राहिले नाहीत. सध्या हळद दर १४ ते १५ हजार रुपये क्विंटलभर स्थिरावले आहेत. यंदा मात्र लागवड क्षेत्रात पुन्हा काहीशी वाढ झाल्याने दर काहीसे दबावात राहतील, अशी भीती आहे.

Turmeric
Turmeric Farming : वेळेवर करा हळद पिकात भरणी

...असा आहे खर्च

यंदाच्या हंगमात हळद बेणे पाच हजार रुपये क्‍विंटल होते. एकरी ९ क्‍विंटल बेण्याची गरज राहते. त्यानुसार ४५ हजार रुपयांचा खर्च बेण्यावर होतो. त्यासह व्यवस्थापनावरील खर्च अपेक्षित धरता एकरी ६० ते उत्पादकता अधिक घेतल्यास त्याप्रमाणात खर्च वाढत तो ८५ हजारापर्यंत जातो, असे हळद उत्पादक डॉ. गजानन ढवळे सांगतात. उत्पादकता अधिक हवी असल्यास त्या प्रमाणात निविष्ठांचा वापरही वाढतो. त्यामुळे उत्पादकता खर्चातही वाढ होते, असे त्यांनी सांगितले.

सांगली तसेच तेलंगणा राज्यातील हळद फेब्रुवारीत बाजारात येते. त्यावेळी कमी आवक असल्याने चांगला दर मिळतो. विदर्भातील हळदीची आवक एप्रिल महिन्यात होते. आवक अधिक असल्याने दर काहीसे दबावात राहतात. मात्र गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता दर १० हजार रुपयांच्या खाली मिळाले नाहीत.
- डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर (जैन), वाशीम
पंधरा दिवसांपूर्वी १५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर होते. आता हे दर काहीसे दबावात आले आहेत. हळदीची प्रत पाहून १३ ते १४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. यापुढील काळात दर वाढतील या अपेक्षेने आवक देखील कमी होत आहे. हिंगोली बाजारात दररोज सरासरी २००० क्विंटलची आवक होते. आठवड्यातील आवक ही दहा हजार क्विंटलपर्यंत राहते. दर चांगले मिळाल्याने लागवड क्षेत्र वाढले. परिणामी, नव्या हंगामात आवक वाढल्यास दर दहा ते अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल राहतील.
- अशोक बाहेती हळद खरेदीदार, हिंगोली बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com