Soybean Cotton Rate
Soybean Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Soybean Rate : कापूस, सोयाबीनच्या दरांत नरमाई

डॉ.अरूण कुलकर्णी

कापसाची आवक (Cotton Arrival) हळूहळू वाढती आहे. कापसाच्या किमती (Cotton Rate) या महिन्यात घसरत आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत मक्याची आवक (Maize Arrival) वाढत होती; त्यानंतर ती कमी होत आहे. सोयाबीनची आवकसुद्धा (Soybean Arrival) ४ नोव्हेंबर पर्यंत वाढत होती; त्यानंतर ती कमी झाली आहे. मक्याच्या किमतीमध्ये वाढता कल आहे; सोयाबीनच्या किमती (Soybean Rate) रु. ५,६५० च्या आसपास आहेत.

या सप्ताहात कापूस व सोयाबीन वगळता सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या. कापसाच्या किमती १.८ टक्क्याने, तर सोयाबीनच्या ०.३ टक्क्याने घसरल्या. तुरीच्या किमतीत ४.९ टक्क्यांनी, तर हळदीच्या किमतीत १.९ टक्क्याने वाढ झाली. कांदा व टोमॅटोची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेने अनुक्रमे १६ व ४८ टक्क्यांनी अधिक आहे.

या वर्षी (२०२३) हळदीचे NCDEX मधील व्यवहार फक्त एप्रिल, मे, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर या सहा डिलिव्हरी महिन्यांसाठी होतील. २०२२ मध्ये ते नऊ महिन्यांसाठी होते. कापसाचे वायदे बाजार जानेवारीनंतर होणार की नाहीत याची माहिती अजून नाही. मक्याचे वायदे बाजारातील व्यवहार फार कमी झाले आहेत. सोयाबीनचे व्यवहार बंद होऊनसुद्धा बरेच महिने झाले. शासनाचे या बाबतचे धोरण अनिश्चित आहे.

या सप्ताहामधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३१,९४० वर आले होते; या सप्ताहात ते पुन्हा १.८ टक्क्याने घसरून रु. ३१,३५० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) १.२ टक्क्याने घसरून रु १,६७५ वर आले आहेत. कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती १.१ टक्क्याने वाढून रु. २,२२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२३८ वर आले आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२५२ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२७६वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,२३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.९ टक्क्याने वाढून रु. ७,३६४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ८,२८६ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ८,४०८ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. ४,९६७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने वाढून रु. ५,००७ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) रु. ५,६७२ वर आली होती; या सप्ताहात ती ०.३ टक्क्याने घसरून रु. ५,६५६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ७,१६८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,१४० होती; या सप्ताहात ती रु. १,२०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४६० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ४८३ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची

किंमत प्रति १७० किलोची गाठी;

कपाशीची किंमत प्रति २० किलो).

: arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT