Anil Jadhao
आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कापूस ७८ सेंट प्रतिपाऊंडवर होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आठवडाभर चढ उतार राहीले.
शुक्रवारी कापसाचा बाजार ८२ सेंटवर बंद झाला. म्हणजेच कापसाने या आठवड्यात ४ सेंटने उभारी घेतली.
देशात मात्र कापसाचा बाजारही स्थिर होता.
डिसेंबरच्या सुरुवातीला कापसाचा भाव नरमला होता. तो याही आठवड्यात कायम राहीला.
देशात सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ४०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळतोय. याच दरपातळीवर आठवड्यात बाजार बंद झाला.