Pume APMC  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अडत्यांकडून परदेशी भाजीपाला उत्पादक आणि पुरवठादार शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) डमी अडत्यांचा (Dummy Adtya Pune APMC) सुळसुळाट झाला आहे. या अडत्यांकडून परदेशी भाजीपाला उत्पादक (Foreign Vegetable Growers) आणि पुरवठादार शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दोन-तीन वर्षांपासून लाखो रुपये थकीत आहेत. या बाबतची मागणी केल्यास दमदाटी करण्यात येते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचा (Out Of Maharashtra Traders) समावेश आहे. कोणाच्या आशीर्वादाने हे व्यापारी बाजार समितीमध्ये विना परवाना व्यवसाय करीत आहेत, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

परवानाधारक गाळ्यावर अनेक बनावट (डमी) व्यापारी दैनंदिन भाडेतत्त्वावर बेकायदा व्यवसाय करीत आहेत. याला बाजार समिती अधिकाऱ्यांचा 'अर्थपूर्ण आशीर्वाद' असल्याची चर्चा आहे. हे व्यापारी गाळ्यावर आलेल्या शेतीमालाची नोंद न करता, केवळ चिठ्ठीवर व्यवहार करतात.

फसवणुकीबाबत कैलास जाधव (मोहगाव, जि. नाशिक) या परदेशी (एक्झॉटिक) भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि पुरवठादाराने माध्यमांकडे कैफियत मांडली. जाधव म्हणाले,‘‘ मी गेल्या सात आठ वर्षांपासून पुणे बाजार समितीत स्वतःचा आणि संकलित केलेला परदेशी भाजीपाला विक्रीसाठी आणत आहे.

अनेक दिवस काही अडत्यांच्या गाळ्यावरील व्यापाऱ्यांकडे नियमित भाजीपाला पाठवीत आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून संजयकुमार आणि विजय कुमार कामठी या दोन व्यापाऱ्यांकडून पैसे थकविले जात आहेत. या बाबत बाजार समितीकडे सातत्याने तक्रार केली. त्यांनी काही प्रमाणात पैसे मिळवून देखील दिले. मात्र कोरोना काळात गेल्या दोन तीन वर्षांपासून हे व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत.

माझे आठ लाख रुपये थकीत होते. वारंवार मागणी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून तडजोड करून पाच लाख रुपये देण्याचे ठरले. या बाबतचा स्टॅम्पपेपरवर करार देखील करून घेतला. मात्र अद्याप करारानुसारचे पाच लाख रुपये थकीत आहेत. या बाबत बाजार समिती देखील वारंवार संबंधित व्यापाऱ्याला तंबी देत आहे. मात्र अद्याप पैसे मिळालेले नाहीत.’’

सिद्धार्थ कोहिनकर (रा. दोंदे, ता. खेड, जि. पुणे) म्हणाले,‘‘ मी १० एकरवर विविध प्रकारच्या परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. पुणे बाजार समितीमधील शिवाजीराव निकम यांच्या (गाळा क्रमांक ५३५) आणि धोंडिबा पोमण (गाळा क्रमांक ४९५) या गाळ्यांवर हा भाजीपाला विक्रीस पाठवीत होतो. मात्र या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत हिशोब पट्टी न देता केवळ कागदाच्या चिठ्ठीवर व्यवहार होत होता. काही दिवस पैसे रोखीने आणि गुगल-पे द्वारे मिळाले.

आता मात्र पैसे देण्यास विलंब होत आहे. दोन व्यापाऱ्यांकडे ३२ हजार रुपयांची थकबाकी आहे. हे पैसे मागण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना फोन केले, तर तर उडवा उडवीची आणि धमकीची भाषा वापरतात. या बाबत बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. या बाबत न्याय मिळणे अपेक्षित आहे.’’

शेतकऱ्यांचे पैसे कोणी थकवत असेल, देत नसेल, तर अशा व्यापाऱ्यांना बोलावून शेतकरी आणि व्यापारी समोरासमोर बसविण्यात येईल. शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील. या प्रकरणाची चौकशी करू.
बाबा बिबवे, विभाग प्रमुख, भाजीपाला विभाग, पुणे बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT