Jowar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Market : खानदेशात दादर ज्वारीचे दर दबावात

Jowar Rate : खानदेशात दादर ज्वारीची आवक सुरू झाली आहे. परंतु यंदा दर अपेक्षित नसल्याची स्थिती असून, किमान २५५० व कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीची आवक सुरू झाली आहे. परंतु यंदा दर अपेक्षित नसल्याची स्थिती असून, किमान २५५० व कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. कमाल दर सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.

आवक मागील आठवड्यात खानदेशात सुरू झाली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीसाठी खानदेशातील तापी, अनेर, पांझरा, गिरणा काठ प्रसिद्ध आहे. काळ्या कसदार जमिनीत दिवाळीनंतर कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी झाली होती. काही शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्याने शेत ओलावून त्यात मशागत करून पेरणी करण्यात आली होती.

अनेकांनी विद्यापीठाच्या संशोधित, सुधारित दादर ज्वारी वाणांची पेरणी केली होती. काही शेतकऱ्यांनी दोन वेळेस सिंचन केले. तर काहींनी तीन वेळेस सिंचन केले. वेळेत पेरणी झालेल्या दादर ज्वारीची आवक मागील आठवड्यात सुरू झाली. या आठवड्यात आवक वाढली आहे.

मागील वर्षी सुरुवातीला दादर ज्वारीचे दर सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल असे होते. परंतु यंदा सुरुवातीला सरासरी दर ३३०० व काही बाजार समित्यांत ३४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

अल्प शेतकऱ्यांना कमाल ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. तर कमाल शेतकऱ्यांना २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. मागील हंगामात दादर ज्वारीला उच्चांकी ५३०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही एप्रिलमध्ये मिळाला होता. दर सुरुवातीपासून बऱ्यापैकी होते. परंतु यंदा सुरुवातीलाच किंवा आवक कमी असतानाही दर हवे तसे नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

सध्या खानदेशात दादर ज्वारीची प्रतिदिन सरासरी ९०० क्विंटल आवक होत आहे. सर्वाधिक २५० ते २६० क्विंटल आवक चोपडा येथील बाजारात होत आहे. जळगाव बाजार समितीतही आवक बऱ्यापैकी आहे.

खानदेशात दादर ज्वारीसाठी जळगावमधील जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील शहादा व नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. पुढे आवक आणखी वाढेल, असेही संकेत आहेत. यामुळे दर दबावात राहतील, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT