Jowar Sowing : रब्बी हंगामात ज्वारीने घातलीय भुरळ

Rabi Season : पाऊस व इतर कारणांमुळे खरिपात ज्वारीची लागवड दरवर्षी कमी होत आहे. मात्र, शेतकरी रब्बीत या पिकाला पुन्हा पसंती देत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
Jowar Sowing
Jowar Sowing Agrowon
Published on
Updated on

Akola News : पाऊस व इतर कारणांमुळे खरिपात ज्वारीची लागवड दरवर्षी कमी होत आहे. मात्र, शेतकरी रब्बीत या पिकाला पुन्हा पसंती देत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. यावर्षात पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत रब्बीत सुमारे २७ हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे.

पीक जोमदार असून चांगले उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. या लागवडीत बुलडाणा जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे २३ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झालेली आहे.

गेल्या काही वर्षांत खरिपात पाऊस, वन्यजीवांना त्रास, मागील काळात कमी मिळालेले दर यामुळे ज्वारीची लागवड कमी व्हायची. याचा फटका जनावरांच्या चारा उत्पादनावरही झाला. दरम्यानच्या काळात ज्वारीचे चांगले वाण उपलब्ध झाले. तसेच बाजारात ज्वारीची मागणी व दरही वाढले.

Jowar Sowing
Jowar Fodder : ज्वारीचा कडबा शेकडा ५००० ते ५५०० रुपये

साहजिकच आता ज्वारीचे थोडे अर्थकारण सुधारले. यामुळे शेतकरी पुन्हा ज्वारी लागवडीकडे वळत आहेत. खरिपाऐवजी रब्बीत लागवड फायदेशीर होत असल्याचा मागील काही वर्षातील अनुभव सुद्धा गाठीशी आहे. यामुळे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी ज्वारीची लागवड करू लागले.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी तर अधिक पसंती दिली. रब्बीत या जिल्हयात पहिल्यांदा मका पिकापेक्षा (१५ हजार हेक्टर) ज्वारीचे लागवड क्षेत्र (२३ हजार हेक्टर) वाढले आहे. अकोला जिल्ह्यात रब्बीत यंदा ज्वारी लागवडीने सुमारे अडीच हजार हेक्टरकडे झेप घेतली. वाशीम जिल्ह्यात मात्र तुलनेने सरासरी क्षेत्रही लागवडीखाली येऊ शकलेले नाही.

Jowar Sowing
Dadar Jowar : सुसाट वाऱ्याने दादर ज्वारी आडवी

हरभरा मोडून ज्वारीची लागवड

या हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक काढून हरभरा लागवड केली होती. दरम्यान नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस, धुक्यामुळे हरभऱ्यात मर रोगाचे प्रमाण वाढले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पीक मोडावे लागले.

अशा शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या मोडलेल्या क्षेत्रात ज्वारीची लागवड केली. त्यामुळे हे क्षेत्र बुलडाण्यात सुमारे २३ हजार हेक्टर तर अकोल्यात २३०० पेक्षा अधिक झाले आहे. मागील काही वर्षात ज्वारीचा दर वाढलेला आहे. सध्या ज्वारीचा दर किमान तीन हजारांच्या पुढे आहे. ज्वारीच्या वेगवेगळ्या वाणांना भिन्न दर आहेत. काही ठिकाणी ज्वारी प्रति किलो ५० रुपयांपेक्षा जास्त आहे. कडब्यालाही चांगली मागणी राहत असल्याने ज्वारीकडे कल वाढला आहे.

लागवड दृष्टीक्षेपात (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी लागवड टक्के

बुलडाणा १२७६१ २३२५५ १८२

अकोला ९१२ २३०८ २५३

वाशीम १२०० १०१९ ८५

शेतकऱ्यांनी रब्बीत पीक फेरपालटावर जोर दिला. शासनानेही यंदा चारावर्गीय पिकाच्या बियाण्यासाठी अनुदान दिले. भरडधान्य वर्षात दिलेले प्रोत्साहन रब्बीत ज्वारीच्या लागवड वाढीत झाले. बाजारात मिळत असलेला दर ही बाबही लागवडीकडे वळवण्यास फायदेशीर झाली. सर्व बाबी जुळून आल्याने ज्वारीची लागवड वाढली. पीकही चांगले निसवले असून यंदा सर्वत्र जोमदार दिसते आहे. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा वाढलेली आहे.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com