पुणेः देशात मागील काही महिन्यांपासून गव्हाचे दर (Wheat Rate) तेजीत आहेत. त्यामुळे चालू रब्बी हंगामातील गहू लागवडीकडे (Wheat Cultivation) सर्वांचे लक्ष लागून आहे. देशात १८ नोव्हेंबरपर्यंत गव्हाची लागवड (Wheat Sowing) जवळपास १५ टक्क्यांनी जास्त झाली आहे. तर मोहरीलाही (Mustard Rate) यंदा चांगली पसंती मिळत आहे. देशातील शेतकऱ्यांनी यंदाही मोहरीची लागवड (Mustard Cultivation) जवळपास १५ टक्क्यांनी वाढवली.
चालू रब्बी हंगामात सरकारने गहू लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. त्यातच निर्यातही चांगली झाली. त्यामुळे देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला. यंदा पेरणी वाढून उत्पादन वाढल्यास केंद्र सरकारला वाढलेल्या गव्हाच्या किमतीवर नियंत्रण आणता येईल. तसेच सध्या सरकारचा बफर स्टाॅक अनेक वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यात सरकारला सुधारणा करता येईल.
देशात रब्बीची १८ नोव्हेंबरपर्यंत २६९ लाख हेक्टरवर लागवड झाली. तर मागील हंगामात याच काळातील लागवड क्षेत्र २५१ लाख हेक्टरवर होते. यात गव्हाची १०१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी याच काळतील पेरणी क्षेत्र ८८ लाख हेक्टर होते. म्हणजेच यंदा लागवड १३ लाख हेक्टरने आघाडीवर आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीतून मिळाली.
देशात सोयाबीननंतर मोहरी या तेलबिया पिकाचे सर्वाधिक उत्पादन होते. मोहरीवर खाद्यतेलासाठी देशाची भीस्तही जास्त आहे. त्यामुळे मोहरीचा पेरा कसा राहतो, याकडे सरकारसह उद्योगाचे लक्ष आहे. मागील हंगामात सोयाबीनप्रमाणे मोहरीलाही चांगला दर मिळाला होता.
त्यामुळे शेतकरी यंदा मोहरीची लागवड वाढवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात १८ नोव्हेंबरपर्यंत ६३ लाख हेक्टरवर मोहरीची पेरणी झाली. तर मागील हंगामात याच काळातील मोहरीचे पेरणी क्षेत्र ५५ लाख हेक्टर होते. म्हणजेच यंदा ८ लाख हेक्टरने पेरा आघाडीवर आहे.
मागील हंगामात शेतकऱ्यांना गहू आणि मोहरीपासून चांगला परतावा मिळाला. तर इतर हरभऱ्यासारख्या इतर पिकांचे दर कमी होते. त्यामुळे शेतकरी गहू आणि मोहरीची लावगवड वाढवत आहेत. चालू हंगामात गहू आणि मोहरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.अश्विनी बनसोड, कमोडिटी रिसर्च, फिलिप कॅपिटल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.