Faizpur Goat Market : सातपुडा पर्वतरांग वन, जलसंपदेने समृद्ध आहे. या डोंगररांगांतील परिसरातील केळी, भरिताची वांगी देश, परदेशात पोचली आहे. तसे या भागातील उमद्या,जातिवंत पशुधनाला देखील चांगली मागणी आहे. या शिवारातील वातावरणात तग धरणाऱ्या, रोगप्रतिकारक्षम गावरान शेळ्या प्रसिद्ध आहे. या शेळ्यांना मोठी बाजारपेठ आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारच्या शहादा, तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा डोंगररांगांतील गावांतील शेतकऱ्यांनी जातिवंत गावरान शेळ्यांचे चांगले संगोपन केले आहे. .देशी किंवा गावरान जातीच्या शेळ्यांचे संगोपन सातपुड्यालगतच्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात अधिक आहे. हा भाग डोंगराळ, विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. या भागातील वातावरणात या शेळ्यांचा निकोप विकास झाला आहे.\.Goat Sheep Market : मुरूड शेळी-मेंढी बाजाराचा महाराष्ट्रासह चार राज्यात दबदबा.दर बुधवारी शेळी बाजारफैजपूर शहर हे रावेर व यावल या तालुक्यांच्या सीमेवर आहे. शिवाय मध्य प्रदेशातील खरगोन, बुऱ्हाणपूरपासूनदेखील जवळ आहे. यामुळेच सुमारे १०० वर्षांपासून फैजपूर येथे दर बुधवारी शेळ्यांचा बाजार भरत आहे. जाणकारांनुसार १९०५-०६ पासून सावदा येथे हा बाजार भरत आहे. १९५८ च्या सुमारास हा बाजार अधिकृतपणे यावल (जि.जळगाव) येथील बाजार समितीच्या अंतर्गत आला. सद्यःस्थितीत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील यावल बाजार समितीच्या फैजपूर शहरातील उपबाजार आवारात शेळ्यांचा बाजार भरत आहे. रावेराची वित्तीय राजधानी सावदा आणि फैजपूर शहरातील अंतर एक किलोमीटरपेक्षा कमी आहे. फैजपूर हे कृषी व बिगर कृषी व्यवहारांचेदेखील मोठे केंद्र आहे. केळीची शेती या परिसरात अधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेळीपालनाला पसंती दिली आहे..शेतकऱ्यांचा पुढाकार व संकल्पनेतूनच फैजपुरात शेळी बाजार तयार झाला. फैजपूरचा शेळीबाजार खानदेशातील महत्त्वाचा सर्वात जुना बाजार आहे. या बाजारात गावरान शेळ्या अधिकच्या विक्रीसाठी येतात. शेळ्यांसह बोकडही असतात. जुलैच्या मध्यापासून ते ऑक्टोबरअखेर किंवा दिवाळीपर्यंत ही आवक कमी किंवा अल्प असते. या काळात दर बुधवारी सरासरी ४०० ते ५०० शेळ्या विक्रीसाठी येतात. नोव्हेंबर ते जून या काळात शेळ्यांची आवक अधिक असते. या काळात प्रति बुधवार सरासरी ११०० ते १२०० शेळ्या विक्रीसाठी येतात. मात्र श्रावणमास ते दिवाळी या कालावधीत परराज्यातील खरेदीदार फारसे येत नाहीत..बाजारात मोठी उलाढालशेळ्यांच्या विक्रीतून फैजपूरच्या बाजारात दर बुधवारी मोठी उलाढालदेखील होते. नोव्हेंबर ते जून या कालावधीत ही उलाढाल दर बुधवारी एक ते सव्वा कोटी रुपये असते. बकरी ईदच्या कालावधीत बुधवारच्या बाजारातील उलाढाल दोन कोटींवर पोचते. तर जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत ही उलाढाल दर बुधवारी ५० ते ५५ लाख रुपये एवढी असते. यातून यावल बाजार समितीला बऱ्यापैकी महसूल मिळतो.या बाजारात मध्य प्रदेशातील खरगोन, बडवानी, बऱ्हाणपूर या भागातील शेळ्यादेखील विक्रीसाठी येतात. तसेच गावरान पाठोपाठ उस्मानाबादी, राजस्थानी व अन्य जातीच्या शेळ्या, बोकडही विक्रीसाठी येतात. बकरीईदच्या कालावधीत कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहारमधील खरेदीदार या बाजारात बोकड, शेळ्या खरेदीसाठी येतात. या कालावधीत मोठी उलाढाल बाजारात होते. फैजपुरातून देशी, गावरान शेळ्यांची विक्री ठाणे, कल्याण, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार राज्यातील बाजारपेठेत होते..Goat Farming : शेळीपालन, रेशीम उद्योग एकमेकांस पूरक .शेळीपालन ठरतेय फायदेशीर...दहिगाव (ता.यावल) येथील शब्बीर पिंजारी लहान वयापासून कुटुंबातील सदस्यांसोबत शेळीपालन करीत आहे. त्यांच्याकडे २५ ते ३० शेळ्या आहेत. फैजपूरच्या बाजारात अनेक वर्षे ते शेळ्यांची खरेदी - विक्री करीत आहेत. गावरान शेळ्यांच्या संगोपनातून दर महिन्याला २० ते २५ हजार रुपये उलाढाल होते. या शेळ्यांना औषधोपचाराची फारशी गरज नाही.कुटुंबातील दोन सदस्य शेळीपालनामध्ये व्यस्त असतात. यावल येथील सादिक पिंजारीदेखील कमी वयातच शेळीपालनाकडे वळले आहेत.दर महिन्यास १० ते १५ हजार रुपयांची त्यांची उलाढाल आहे..गावरान शेळ्यांचे संगोपनमध्य प्रदेशातील खरगोन, बडवानी, बऱ्हाणपूर हे जिल्हे सातपुडा पर्वतात व पर्वतालगत आहेत. सातपुड्यातील पर्वतरांगांत व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांत शेतकरी, आदिवासी बांधव गावरान शेळ्यांचे संगोपन करून विक्री करतात. अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून गावरान शेळीपालन तसेच प्रजनन केंद्र चालवितात. बोकडांच्या तुलनेत शेळ्यांची विक्री अधिक असते. कमाल शेळीपालक मुक्तसंचार पद्धतीने शेळ्यांचे संगोपन करतात. रोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेळ्या गावातील शिवार, माळरानात चरायला सोडल्या जातात. अनेक गावांतील भूमीहीन, अल्पभूधारक, शेतमजूर युवक, कुटुंब, आदिवासी मंडळी शेळीपालनात व्यस्त आहेत. यातून त्यांना चांगला नफा मिळतो. उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे. .सातपुड्यासह खानदेशातील अन्य भागात गावरान शेळ्यांचे संगोपन वाढले आहे. माळरानातील काटेरी झुडपे, अन्य वनस्पतींवर शेळ्यांची गुजराण होते. खानदेशातील तापी, गिरणा, पांझरा, अनेर, सुसरी, गोमाई आदी नद्यांच्या क्षेत्रात आणि अन्य भागात गावरान शेळ्यांचे संगोपन केले जाते. या शेळ्या, बोकड ताकदवान, रोगप्रतिकारक्षम असतात. त्यानुसार त्यांची किंमतही अधिक असते. फैजपुरच्या बाजारात तीन हजारांपासून ते १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत शेळ्या,बोकडाला दर मिळतो. या शेळ्या रोगास प्रतिकारक्षम आहेत. अति उष्णता, थंडीच्या काळात तग धरतात, असा शेळीपालनांचा अनुभव आहे.शेळ्यांची वैशिष्टेचांगली प्रजनन क्षमता, मटणासाठी व्यापाऱ्यांच्याकडून मागणी.कातडीचा रंग सर्वसाधारणपणे लाल, काळा, पांढरा,लाल कातडीवर पांढरे ठिपके.शरीर मध्यम आकाराचे, कपाळ फुगीर, शिंगे लहान गोलाकार. खुरे कठीण, सरळ असतात.माळरानावर गतीने फिरण्याची क्षमता. चांगली रोगप्रतिकारक्षमता.संगोपन खर्च कमी.- डॉ.अतुल नेहेते ९५५२१३०४१७(संपर्क वेळ ः सायंकाळी सहा ते आठ )पशुवैद्यकीय अधिकारी, कानळदा, जि.जळगाव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.