Cotton Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Stock India : कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८४ टक्के अधिक

Cotton Market : गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल ८४ टक्के जास्त असणार आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने हा अंदाज वर्तवला आहे.

रमेश जाधव

Pune News : येत्या सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या कापसाच्या चालू हंगामात (२०२४-२५) देशातील कापसाचा अंतिम साठा सुमारे ५५.५९ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल ८४ टक्के जास्त असणार आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नवीन कापूस हंगाम सुरू होताना कापसाचा शिल्लक साठा जास्त असल्यामुळे उपलब्धता वाढणार आहे.

सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली. कापसाची आवक वाढल्यामुळे यंदाच्या हंगामात कापूस प्रेसिंगचा अंदाज ३११.४० लाख गाठी राहणार असल्याचे म्हटले आहे. आधीचा अंदाज ३०१.१४ लाख गाठींचा होता. महाराष्ट्रात पाच लाख गाठींची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर गुजरात आणि तेलंगणात आधीच्या अंदाजापेक्षा प्रत्येकी दीड लाख गाठींची वाढ आहे.

सीएआयने २०२४-२५ या हंगामासाठी कापसाचा वापर तीन लाख गाठींनी वाढून ३०८ लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या हंगामात कापसाची आयात ३९ लाख गाठी राहण्याचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे.

तसेच १७ लाख गाठी कापूस निर्यातीचा आधी वर्तवलेला अंदाजही कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत निर्यातीत ११.३६ लाख गाठींची घट आहे. गेल्या हंगामात २८.३६ लाख गाठी कापूस निर्यात झाला होता.

दरम्यान, बाजारविश्लेषकांच्या मते देशांतर्गत बाजारात कापसाची उपलब्धता वाढण्याचा अंदाज, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरातील नरमाई यामुळे देशात पुढील हंगामात कापसाचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे.

सीसीआयने कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे. हा कापूस सीसीआय सध्या विकत आहे. सीसीआयकडे जवळपास ६० लाख गाठींच्या आसपास कापूस आहे. या कापसाची विक्री टप्प्याटप्याने सुरु आहे. त्यामुळे पुढील काळातही कापसाची उपलब्धता वाढती राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Farmer Protest: ७/१२ कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प; शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र

Urea Shortage : सांगलीत युरियाची टंचाई

Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

SCROLL FOR NEXT