Cotton Pest Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

जुलै महिन्यातील अतिवृष्टीने नुकसान सोसणाऱ्या कापूस उत्पादकांसमोर आता किडींच्या प्रादुर्भावाचे संकट उभे ठाकले आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : जुलै महिन्यातील अतिवृष्टीने (Heavy Rain) नुकसान सोसणाऱ्या कापूस उत्पादकांसमोर (Cotton Producer) आता किडींच्या प्रादुर्भावाचे ()Pest Outbreak On Cotton संकट उभे ठाकले आहे. गुलाबी डोमकळ्यांचे आक्रमण कपाशीवर सुरू झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने कीड व्यवस्थापन (Cotton Pest Management) सुचविले आहे.

अमरावती हा कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे. या पिकांचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. आता त्यावर किडींचे आक्रमण वाढले आहे. कापूस पिकावर सुरूवातीच्या काळात मावा, तुडतुडे व फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरडवाहू कपाशीवर मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. तर, शेवटच्या आठवड्यात तुडतुड्यांनी आक्रमण केले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फुलकिड्यांनी आक्रमण करून शेतकऱ्यांना हैराण केले असतानाच गुलाबी डोमकळ्यांच्याही आक्रमणास सुरूवात झाली आहे.

कृषी विभागाने असे सुचविले कीड व्यवस्थापन...

- बीटी कपाशीच्या बियाण्यास ईमाडायक्लोप्रीड किंवा थायोमेथॉक्साम कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे पिकांना २ ते ३ आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते.

- या कालावधीत कीटकनाशकाची फवारणी करू नये

- वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा नष्ट करावा

- पिवळे चिकट सापळे लावावेत

- कपाशीत चवळीचे पीक घ्यावे

- आंतर मशागतीने पीक तणविरहीत ठेवावे

- अंबाडी, रानभेंडी नष्ट करावी

- सीरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा

कृषी विभागाने सुचविलेल्या कीड व्यवस्थापनाची काटेकोर अंलबजावणी केल्यास कपाशीचे नुकसान टाळता येईल. सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. पीक वाचविण्यासोबतच उत्पादनाची सरासरीही वाढवा
अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT