Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Export : कापूस निर्यात सुरळीत; सुतगिरण्याही फायद्यात

युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट केलं. भारतातील कापूस उत्पादन ३२६ लाख गाठींवर स्थिरावेल.

अनिल जाधव

Cotton Market Rate पुणे ः अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जागतिक तसेच भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला.

तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी युएसडीएच्या या अंदाजाला दुजोरा देत देशातील उद्योगांची कापसाची मागणी वाढली असून सुतगिरण्या फायद्यात असल्याचे सांगितले. निर्यातही वेगाने सुरु असल्याचं स्पष्ट केलं.

यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट केलं. भारतातील कापूस उत्पादन ३२६ लाख गाठींवर स्थिरावेल. युएसडीएचा जानेवारीतील अंदाज ३३९ लाख गाठींचा होता. म्हणजेच एका महिन्यातच उत्पादनाच्या अंदाजात १३ लाख गाठींची कपात करण्यात आली.

तर जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजात १८ लाख गाठींची कपात केली. जागतिक कापूस उत्पादन १ हजार ४६३ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

तसेच चीन, बांगलादेश आणि टर्कीची कापूस आयात काहीशी कमी होईल. भारतासाठी बांगलादेशमधील परिस्थिती महत्वाची आहे.

कारण भारताच्या कापसाचा बांगलादेश महत्वाचा ग्राहक आहे. यंदा शेजारच्या पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट झाली. पण कापूस आयात स्थिर राहण्याची शक्यता आहे.

या देशांची कापूस आयात घटणार (गाठींमध्ये)

देश…आयातीतील घट

चीन…१.२८ लाख

बांगलादेश… ३ लाख

टर्कीची…७ लाख

युएसडीच्या या अंदजाविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, युएसडीएचा हा अंदाज खरा असू शकतो. सीएआयचा अंदाज ३३० लाख गाठींचा आहे. पण पुढील बैठकीत यात कपातही होऊ शकते. सध्या देशातील उद्योगांकडून कापसाला चांगली मागणी आहे, असंही गणात्रा यांनी सांगितलं.

भाराताचा कापूस स्वस्तच

देशातील उद्योग आणि निर्यातीसाठी सध्या कापसाला चांगली मागणी आहे. देशातील सुतगिरण्यांसाठी सध्या चांगली वेळ आहे, सध्या सुतगिरण्या ८५ ते ९० टक्के क्षमतेने सुरू आहेत. सुतगिरण्यांना सध्या तोटा होत नाही.

गुजरातसह महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमधील सुतगिरण्यांना एक किलो सुतामागे १० रुपयांचा नफाही होत आहे. तसेच बांगलादेश आणि शेजारच्या देशांकडून कापूस निर्यातीसाठी मागणीही चांगली आहे. भारतातून रोज ५ ते १० हजार गाठी निर्यात होत आहे. सध्या भारतातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय दरापेक्षा स्वस्त आहेत.

भारताचा कापूस ६१ हजार ५०० ते ६२ हजार रुपये प्रतिखंडी आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा म्हटल्यास ६५ हजाराने मिळेल. आयातशुल्कासह एक खंडी कापूस ७० हजार रुपये पडेल. त्यामुळे देशातील सध्याचे दर परवडणारे आहेत, असेही गाणात्रा यांनी स्पष्ट केले.

देशातील दरपातळी

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच होते. कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती.

कापसाची बाजारातील आवक शनिवारी (ता. ११) स्थिर होती. बाजारभाव दबावात असले तरी, उद्योगांकडून मागणी वाढली. निर्यातही सुरू झाली.

त्यातच देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करण्यात आला. कापसाचे वायदेही सुरू होत आहेत. एकूणच देशात कापूस दर सुधारण्यास पूरक परिस्थिती आहे. कापसाच्या भावात पुढील काही दिवसांत सुधारणा होऊ शकते.

कापसाचा भाव या हंगामात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT