Team Agrowon
कापूस निर्यात थंडावल्याने कापसातील तेजीला ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातील दरपातळीच्या तुलनेत भारतीय कापूस महाग पडतोय.
त्यामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. बांगलादेश आणि व्हिएतनामसारखे देश भारताऐवजी ब्राझीलसारख्या देशांमधून कापूस आयात करत आहेत.
त्यातच डॉलरच्या तुलनेत रूपयातील घसरण आता कमी झाली आहे. त्याचाही प्रतिकूल परिणाम निर्यातीवर होत आहे.
तसेच चीनकडून कापसाची अपेक्षित मागणी नाही. तिथे कोरोना निर्बधांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
तेथील अस्थिर राजकीय स्थितीचा कापसाच्या मागणीवर परिणाम होणार आहे. एकंदर कापसाला गेल्या वर्षीइतका विक्रमी भाव मिळणार नाही, परंतु मंदीही येणार नाही.
कापसाचे किमान भाव नऊ हजार रूपयांच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.