Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : केळीच्या दर प्रश्नी समिती गठित

केळी उत्पादक शेतकऱ्याला जाहीर दरानुसार किंवा योग्य भाव मिळावा व पुढे ग्राहकाला योग्य दरात केळी उपलब्ध व्हावी यासाठी पाचोरा (जि.जळगाव) बाजार समितीने समिती गठीत केली आहे.

टीम ॲग्रोवन

पाचोरा, जि.जळगाव ः केळी उत्पादक शेतकऱ्याला (Banana Producer Farmer) जाहीर दरानुसार किंवा योग्य भाव मिळावा व पुढे ग्राहकाला योग्य दरात केळी (Banana Rate) उपलब्ध व्हावी यासाठी पाचोरा (जि.जळगाव) बाजार समितीने समिती (Pachora APMC) गठीत केली आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद देत येथील बाजार समितीने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केळी उत्पादकांसाठी पाचोरा बाजार समिती बोर्ड भाव जाहीर करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

केळीला जाहीर दरापेक्षा ( बोर्ड भाव) कमी दर मिळतात, मंदीचे कारण सांगून लूट केली जाते, व्यापारी मुजोर झाले आहेत, जे दर जाहीर होतात, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केळीच्या शिवार खरेदीवर कुणाचेही नियंत्रण नाही. प्रशासन कारवाई करीत नाही, अशा तक्रारी केळी उत्पादकांनी बाजार समतीकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संजय महाजन, पाचोरा तालुकाध्यक्ष नाना महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीने यानंतर केळी दर प्रश्नी बैठक बोलावली.

या बैठकीत केळी दर रोज जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी एक सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीत शेतकरी, व्यापारी, बाजार समितीच्या प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती सावदा, रावेर, बऱ्हाणपूर येथील केळी भावानुसार भाव निश्चित करणार आहे. याशिवाय विनापरवाना केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परवाना देण्याची प्रक्रिया देखील बाजार समितीकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

यावेळी रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, नसीर बागवान, मोहम्मद एजाज शफी बागवान, राजेंद्र पाटील, राम केसवानी, हिंमतसिंग पाटील, डॉ. विजयसिंह पाटील, राजेंद्रसिंग पाटील, संजय महाजन, स्वरूप राजपूत, सोमनाथ पाटील, भास्कर पाटील, सचिव बी. बी. बोराडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT