Orange  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange : संत्रा फळगळ अभ्यास समिती उरली कागदावरच

यंदाच्या हंगामात मार्च महिन्यातच तापमान वाढ झाल्याने संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. एकूण पाच लाख टन उत्पादनाच्या दोन लाख टन संत्रा गळून पडला या संत्र्याची किंमत ५०० कोटींच्या घरात होती.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : संत्रापट्ट्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या फळगळीच्या (Orange Fruit Fall) समस्येचे निदान संशोधक संस्थांना गेल्या अनेक वर्ष करता आले नाही. अशातच फळगळीवर (Issue Of Orange Fruit Fall) काहीतरी केल्याचा आव आणण्यासाठी गेल्यावर्षी कृषी विद्यापीठस्तरावर अभ्यास समितीची (Committee For Study On Orange Fruit Fall) स्थापना करण्यात आली. मात्र एका बैठकीनंतर या समितीची कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

यंदाच्या हंगामात मार्च महिन्यातच तापमान वाढ झाल्याने संत्रापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. एकूण पाच लाख टन उत्पादनाच्या दोन लाख टन संत्रा गळून पडला या संत्र्याची किंमत ५०० कोटींच्या घरात होती. या संकटातून कसेबसे सावरलेल्या शेतकऱ्यांनी झाडावर शिल्लक फळांचे व्यवस्थापनावर भर दिला. त्या माध्यमातून काही प्रमाणात नुकसान कमी करता येईल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु जुलै महिन्यात पावसाची संततधार राहिली. परिणामी आंबिया बहार असलेल्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. यातूनच फळांजवळ काळपट डाग पडून मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. सुमारे दीड लाख टन संत्रा गळून पडल्याचा अंदाज महाऑरेंजकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दरवर्षी संत्रापट्ट्यात कोणत्या ना कोणत्या कारणातून फळगळीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु या समस्येचे स्थायी समाधान शोधण्यात संशोधन संस्थांना आजवर यश आले नाही. त्यामुळे या संस्थांच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संत्रा फळगळीचे समाधान शोधण्याच्या प्रयत्न अंतर्गत डिसेंबर २०२१ मध्ये फळगळ अभ्यास समितीचे स्थापन केले होते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कुलगुरू आहेत. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, विस्तार संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक, अमरावती व नागपूर विभागीय कृषी सहसंचालक, कीटकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, फळशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून मनोज जवंजाळ व रमेश जिचकार यांचा सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. ४ जानेवारी २०२२ रोजी या समितीची पहिली व एकमेव सभा झाली. त्यानंतर ही समिती अस्तित्वहीन झाल्याने तहान लागल्यावरच विहीर खोदणार काय ? असा सवाल या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे.

पहिल्या बैठकीत झालेले निर्णय

- संत्रा उत्पादकांसाठी दर महिन्याला शेतीशाळा.

- केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था तसेच कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून निविष्ठांचा डोज देण्याकरता एकत्रित शिफारस.

- संत्रा प्रक्रिया विषयक संशोधनात्मक कार्य.

- अचलपूर व काटोल येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या माध्यमातून फळगळ विषयक तांत्रिक मार्गदर्शन.

संत्रापट्ट्यातील विविध समस्यांसोबतच इतर समस्यांवर चर्चा करण्याकरिता कृषी विभाग व कृषी विद्यापीठस्तरावर संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशा मागणीचे पत्र कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT