Cotton Cultivation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton : सामूहिक कापूस शेती फायदेशीर ः डॉ.मायी

कापसाची शेती ही सामूहिक पद्धतीने केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन साऊथ एशिया बायोटक्नाॅलाॅजी सेंटरचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त मायी यांनी केले.

Team Agrowon

गजानन काळूसे

सिंदखेड राजा, जि. बुलडाणाः कापसाची शेती (Cotton Farming) ही सामूहिक पद्धतीने (Collective Cotton Farming) केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी (Cotton Producer Farmer) एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन साऊथ एशिया बायोटक्नाॅलाॅजी सेंटरचे अध्यक्ष डॉ.चारुदत्त मायी (Dr. C. D. MAyee) यांनी केले.

सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे त्यांनी कापूस पिकाची पाहणी केली. गुलाबी बोंड अळीमुळे कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी पिबी नॉटचा वापर करून बोंड अळीचा नाश होतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सी. डी. मायी यांनी केले. या नवीन तंत्रज्ञानाने बोंड अळीच्या जीवन चक्र पतंग अवस्थेमध्येच रोखण्याचे सामर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

जापनीज तंत्रज्ञानाच्या आधार घेवुन बोंड अळी सुरक्षा स्टिक तयार करण्यात आले आहे. यामुळे बोंड आळीपासून संरक्षण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते. पिबी रोपे तंत्रज्ञानामुळे बोंड अळी पतंग आल्यानंतर त्याला मादी कीटक मिळत नसल्यामुळे तो अंडी घालू शकणार नाही. त्यामुळे बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होईल, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी राजस्थान येथील दक्षिण एशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भगीरथ चौधरी, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, शास्त्रज्ञ डॉ. तारू, कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. पी देशपांडे, राहुल पंचभाई, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT