Poultry  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chicken Rate : राज्यात कोंबड्यांचे दर पोहोचले उच्चांकी १५० रुपयांवर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशात पहिल्यांदाच करार पद्धतीने कुक्‍कुटपालन करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यावसायिकांना १५० रुपये प्रती किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. तापमानात वाढीमुळे कोंबड्यांच्या व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी तसेच मरतुकीचे प्रमाण वाढते यामुळे पक्षी कमी आणि मागणी अधिक त्यामुळे कोंबडीच्या दरात तेजी आल्याचे सांगितले जाते. यापूर्वी देशात उच्चांकी १४२ रुपयांचा दर दोन वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यानंतर आता थेट १५० रुपये किलोवर दर पोहोचले आहेत.

कोंबड्यांमध्ये घामग्रंथींचा अभाव असतो. उष्णता वाढताच हा पक्षी धापा टाकतो. अन्न व पाणी ग्रहणाची परिणामकारकता कमी होते. परिणामी वजन कमी होऊन मरतुकीचे प्रमाण वाढते. त्यामुळेच हिवाळ्यात एका पक्ष्याचे वजन वाढण्यासाठी साधारणतः ८० रुपयांचा प्रती किलो खर्च होतो.

मात्र उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठीच्या उपाययोजना व इतर बाबींवरील खर्चात वाढ होत असल्याने उत्पादकता खर्च ११० रुपये किलोवर पोहोचतो. त्यातच मरतूक वाढल्यास नुकसानीची पातळी वाढते. यंदा तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मरतुकीत वाढ झाली आहे.

त्यामुळेच बाजाराची मागणी पूर्ण होत नसल्याने कुक्‍कुट पक्षांचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर करार पद्धतीने कुक्‍कुटपालन होते. करारदार कंपन्यांचे प्रती किलोचे दर १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

याच दराने कंपन्यांकडून फार्मवरून पक्षांचे लिफ्टिंग होत आहे. पहिल्यांदाच १५० रुपये किलोने पक्ष्यांची उचल होत असल्याने शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

इतर वेळी मरतुकीचे प्रमाण सहा टक्‍के इतके असते. मात्र तापमानात वाढ होत असल्याने हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. त्याच कारणामुळे दर विक्रमी १५० रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी कोरोना काळात १३२ रुपयांवर पोहोचले होते. आता दरातील तेजीमागे मरतुकीचे अधिक प्रमाण तर वाढती मागणी हे मुख्य कारण आहे.
अतुल पेरसपुरे, सदस्य, राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती
पुरवठा कमी असल्याने महाराष्ट्रात प्रती किलो कोंबड्याचे दर वधारले आहे. तेलंगणात हाच दर १३५ ते १४० रुपये असताना महाराष्ट्रात लिफ्टिंग करणाऱ्या कंपन्यांकडून १५० रुपयांचा दर जागेवर दिला जात आहे. उन्हाळ्यात कोंबड्यांचे वजन वाढत नाही. त्यासोबतच मरतूक देखील वाढत असल्याने पुरवठा कमी झाला आहे. रमजान, लोकसभा निवडणूक या कारणांमुळे मागणी वाढ झाली आहे. राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीनिमित्त चिकनची मागणी होते. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. देशात यापूर्वी १४२ रुपयांपर्यंत दर होते. या वेळी विक्रमी १५० रुपयांवर दर गेले आहेत.
- संजय नळगीरकर, अध्यक्ष, पोल्ट्री फार्मस् ॲँड ब्रिडर्स असोसिएशन, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT