Chana Rate
Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Rate : हरभऱ्याला यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता

अनिल जाधव

पुणे ः शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत (Chana Market) असल्याची चर्चा आहे. त्यातच हरभरा लागवड (Chana Cultivation) गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे २०२३ मध्ये हरभऱ्याला चांगला दर (Chana Rate) मिळू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

पण यंदा देशातील हरभरा उत्पादन किती होईल? हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे हरभऱ्याला कमी दर मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हरभरा बाजारात मागील दोन महिन्यांपासून गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता, पुणे आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये टंचाई होती. त्यामुळे दरही वाढले. सध्या या बाजारांमध्ये हरभऱ्याला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. हा दर टिकून राहील, असा अंदाज आहे.

मागील हंगामात हरभरा तोट्याचा ठरला. त्यामुळे यंदा शेतकरी हरभरा लागवड कमी करतील, असा अंदाज होता. पण अगदी मागील आठवड्यापर्यंत पेरा काहीसा जास्त दिसत होता.

मात्र ६ जानेवारीपर्यंत हरभरा पेरणी गेल्यावर्षीपेक्षा १.२४ टक्क्यांनी घटली. मागीलवर्षी ६ जानेवारीपर्यंत १०९ लाख हेक्टरवर हरभरा होता. तर यंदा जवळपास १०८ लाख हेक्टरवर लागवड झाली. मात्र पेरणीचा अंतिम आकडा येईपर्यंत लागवडीतील ही घट आणखी वाढू शकते, असाही अंदाज आहे.

यंदा पिकाला पोषक थंडी पडली नाही. डिसेंबरमध्ये पडणारी थंडी हरभरा पिकाला पोषक असते. तसेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक भागात मर रोग आणि घाटे अळीचाही प्रादुर्भाव झाला. किमान तापमान वाढल्याचाही फटका पिकाला बसत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.

...अशी आहे पीक स्थिती

- देशात सध्या गुणवत्तापूर्ण हरभरा कमी

- उत्पादनही घटण्याचा अंदाज

- १०० लाख टन ते १२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

- पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत

- पुढील महिनाभरातील नुकसानही पाहणे गरजेचे

‘विक्रीआधी दराची चाचपणी करा’

सध्या हरभरा दरात असलेली तेजी बाजारातील कमी आवक आणि गुणवत्तापूर्ण मालाचा तुटवडा असल्याने आहे. हा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. पण पुढील महिनाभरात हरभरा उत्पादनाचे चित्र स्पष्ट होऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता हरभऱ्याची किमान गेल्या वर्षीप्रमाणे वाताहत तरी होणार नाही, असा अंदाज आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी देशातील हरभरा नुकसान, उत्पादन, नाफेडचा साठा आणि उत्पादनाचे अंदाज याकडे बारकाईने लक्ष ठेवावे. हरभरा विक्रीआधी बाजारातील दराची चाचपणी करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले.

सध्या दिल्लीसह महत्त्वाच्या बाजारांमध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. त्यातच यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे त्याचे दर चांगले राहू शकतात.

- राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT