Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : खानदेशात हरभरा आवक आणि दर स्थिर

खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक टिकून आहे. दरही ४४०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक (Chana Arrival) टिकून आहे. दरही (Chana Rate) ४४०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा येथील बाजार हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा हंगाम बऱ्यापैकी होता.

वेळेत व आगाप पेरणीच्या कोरडवाहू क्षेत्रातील देशी हरभऱ्याची आवक सुरू आहे. अद्याप काबुलीमधील लहान व मोठ्या हरभऱ्याची आवक सुरू झालेली नाही. देशी हरभऱ्यास सुरुवातीलाही कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. नंतरही दर स्थिर आहेत.

सध्या जळगावमधील अमळनेर, चोपडा, जळगाव व यावल या बाजारांत प्रतिदिन मिळून एक हजार क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. मागील हंगामातही जानेवारीअखेरीस एवढीच आवक होती व दरही कमाल ५२०० रुपये असेच होते.

यंदाही दर आणि आवक मागील हंगामाएवढीच आहे. पुढे आवक मात्र वाढू शकते. हरभऱ्याची खानदेशात रब्बी हंगामात सर्वाधिक दोन लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा खानदेशातील प्रमुख रब्बी पीक आहे.

देशी हरभऱ्याची पेरणी अधिक असते. जानेवारीच्या मध्यातच यंदा कोरडवाहू क्षेत्रातील हरभऱ्याची मळणी सुरू झाली आहे. किमान दर अनेक भागात ४४०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. स्वच्छ व प्रतवारी केलेल्या हरभऱ्याचे दर यापेक्षा अधिक आहेत.

काबुली हरभऱ्याची आवक फेब्रुवारीच्या मध्यात सुरू होईल. त्याची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात अधिक झाली आहे.

काही खरेदीदार सध्या थेट खरेदी किंवा वाहतूक भाडेही शेतकऱ्यांना देत आहेत. दर टिकून राहतील, अशी शक्यता आहे. कारण उठाव चांगला आहे. काबुली हरभऱ्यासंबंधी गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार खानदेशातील एजंटांकडे मागणी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT