Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांद्याच्या आढाव्यासाठी पुन्हा केंद्राचे पथक राज्य दौऱ्यावर

Onion Rate : कमी पर्जन्यमान व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादन व लागवडी यंदा विस्कळित झाल्या आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : कमी पर्जन्यमान व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादन व लागवडी यंदा विस्कळित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरवातीला खरीप कांद्याची आवक कमी होती तर नंतरच्या टप्प्यात त्यात सुधारणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल सादर केल्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय झाला.

आता त्यानंतर पुन्हा एकदा केंद्राचे पथक उद्या (ता.६) ते शुक्रवार (ता. ९) दरम्यान पाहणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.

केंद्र सरकारचे कृषी व शेतकरी कल्याण विभाग आणि ग्राहक व्यवहार विभागाचे केंद्रीय पथक राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात भेट देऊन रब्बी कांद्याचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन, लेट खरीप उत्पादन, प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा आवकेची सद्यःस्थिती पाहणार आहे.

दौऱ्यादरम्यान हे पथक खरीप आणि रब्बी कांदा उत्पादक पट्ट्यात क्षेत्रीय पाहणी करतील. तसेच उत्पादन क्षेत्र, मुख्य कांदा बाजारपेठांना भेटी देऊन परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध भागधारकांशी संवाद साधतील.

त्यानुसार नियोजन करण्यात येत असून राज्यातील कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार आहे. नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यातील कांदा स्थितीची पाहणी हे पथक करणार आहे.

या पथकात ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक सुभाष चंद्रा मीना, केंद्रीय कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अवर सचिव मनोज, कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे उपसचिव पंकजकुमार, केंद्रीय कृषी विभागाच्या विपणन आणि तपासणी संचालनालयाचे कृषी विपणन सल्लागार बी. के. पृष्टी यांच्यासह राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मागील दौऱ्याचा शेतकऱ्यांना फटका

केंद्रीय पथकाने नोव्हेंबर २०२३ मध्ये खरीप कांदा लागवडीच्या पार्श्वभूमीवर लागवडी, उत्पादकता व संभाव्य उत्पादन यासंबंधी आढावा घेतला होता. त्यावेळी कांदा तुटवडा निर्माण होईल, असा संभाव्य अंदाज दिला. मात्र तो चुकीचा ठरला. प्रत्यक्षात आवक वाढत गेली.

अतिरंजित अहवालाच्या आधारे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. परिणामी शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. पुन्हा एकदा केंद्रीय समिती दौऱ्यावर येणार आहे. आता हे पथक नेमका काय अहवाल केंद्राकडे सादर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT