Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : केंद्राची ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी

केंद्राने ६० लाख साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबर २२ ते ३१ मे २०२३ या मुदतीकरिता हा कोटा आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : केंद्राने ६० लाख साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी दिली आहे. १ नोव्हेंबर २२ ते ३१ मे २०२३ या मुदतीकरिता हा कोटा (Sugar Export Quota) आहे. केंद्रीय खाद्य मंत्रालयाने (Food Ministry) शनिवारी (ता. ५) या बाबतचे परिपत्रक जारी केले. देशातील कारखाने गेल्या तीन वर्षांच्या साखर उत्पादनाच्या (Sugar Production) १८.२३ टक्के एकसमान निर्यात करू शकतात, असे नमूद केले आहे.

केंद्राने निर्यात कोट्यास परवानगी देताना काही नियम कारखान्यांना दिले आहेत. ज्या कारखान्यांना साखर निर्यात करायची नाही ते साखर कारखाने कोटा एक्स्चेंज करू शकतात. ज्यांना साखर निर्यात करायची नाही त्यांनी ६० दिवसांच्या आत कोटा एक्स्चेंज करावा. ज्यांना साखर निर्यात करायची नसेल त्यांनी याच कालावधीत केंद्राला या बाबत कळवावे. तसेच कोटा परत करावा.

कारखान्यांनी कोट्याची अदलाबदल न केल्यास अथवा कोट्याच्या ९० टक्के साखर निर्यात न केल्यास केंद्र जून जुलैच्या कोट्यामध्ये दंड म्हणून संबंधित कारखान्याचा देशांतर्गत विक्री कोट्यामध्ये ३० टक्क्यांपर्यंत कोटा कमी देऊ शकते.

कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य देण्यासाठी ही नियमावली तयार केल्याचे केंद्राने म्हटले आहे. कच्च्या साखरेसह अन्य सर्व प्रकारची साखर निर्यात करता येणार आहे. केंद्राला निर्यातीची दररोज माहिती मिळावी यासाठी दररोज याची नोंद ऑनलाइन ठेवण्याचेही केंद्राने म्हटले आहे.

महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निर्यात

केंद्राच्या निकषानुसार महाराष्ट्रातून सुमारे २० लाख टन साखर निर्यात होऊ शकते. उत्तर प्रदेशाला ही जवळपास इतकाच कोटा आहे. मात्र यंदा ही महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निर्यात होईल, अशी शक्यता आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT