Cashew Nut Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Nut Price: काजू बी दरात किंचित घसरण, आवक वाढली; दर १५५ ते १७० रुपये

Cashew Market Rates: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीच्या आवकेत वाढ झाल्याने किंचित दर घसरले आहेत. सध्या प्रतवारीनुसार १५५ ते १७० रुपये दर मिळत असून, उत्पादन कमी असल्याने लवकरच दर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काजू बी विक्रीची घाई करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी आवक काही प्रमाणात वाढली असून, काजू बीच्या दरात किंचित घसरण झाली आहे. सध्या काजू बीचा दर प्रतवारीनुसार प्रतिकिलो १५५ ते १७० रुपयेपर्यंत आहे. प्रतिकिलो पाच रुपयांची घसरण झाली आहे.

जिल्ह्यात या वर्षी विलंबाने काजू हंगाम सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील मोहर ८० टक्के करपला. त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आहे. २० ते २५ टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरीपासून हंगामाला गती आली असली, तरी १५ मार्चनंतर काजू बीची आवक वाढत असल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला काजू बीला प्रतिकिलो १७५ रुपये दर मिळाला. काजू बीला प्रतवारीनुसार दर दिला जातो. यापूर्वी सरसकट काजू बीला प्रतिकिलो १६० ते १६५ रुपये दर दिला जात होता. तर वेंगुर्ला सात नंतरच्या काजू बीला १७० रुपये दर दिला जात होता. परंतु गेल्या आठवड्यात प्रतिकिलो पाच रुपयांची घसरण दरात झाली आहे.

सध्या सरसकट १६० रुपये दर दिला जात आहे. तर प्रतवारीनुसार १५५, १६० आणि १६५ असा दर दिला जात आहे. दरम्यान या वर्षी काजू बी उत्पादन कमी असल्यामुळे अनेक कारखानदार काजू बी थेट खरेदी करू लागले आहेत. कारखानदाराकडून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यापेक्षा प्रतिकिलो पाच ते दहा रुपये दर दिला जात आहे. थेट बागेत जाऊन ही खरेदी केली जात आहे.

काजू बीचे उत्पादन २० ते २५ टक्केच आहे. त्यामुळे काजू बीच्या दरात वाढ होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे काजू उत्पादकांनी काजू बी विक्रीची घाई करू नये. काही शेतकरी कंपन्या काजू बी खरेदी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोट्यात जाऊन काजू बी विक्री करू नये.
विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT