Cashew Farming: काजू बागेत दुहेरी पद्धतीने खत व्यवस्थापनावर भर

Cashew Production: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दत्ताराम नाईक यांनी त्यांच्या १३ एकर काजू बागेत दुहेरी खत व्यवस्थापनाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य समतोल राखल्याने उत्पादनात सुधारणा होत असल्याचे त्यांचे मत आहे.
Cashew Orchard
Cashew OrchardAgrowon
Published on
Updated on

Cashew Plantation Management:

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : दत्ताराम गणपत नाईक

गाव : वेतोरे कुंब्रल, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती : ३५ एकर

काजू लागवड : १३ एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथे दत्ताराम गणपत नाईक यांची ३५ एकर शेती आहे. त्यातील १३ एकरांमध्ये काजूची सुमारे २५०० कलमे आहेत. त्यात प्रामुख्याने वेंगुर्ला चार, वेंगुर्ला सात, वेंगुर्ला आठ, वेंगुर्ला नऊ आणि गावठी जातीच्या कलमांची लागवड आहे. सध्या काजू हंगाम सुरू झाला असून काजू बी गोळा करण्याचे काम सुरू आहे. काजू बागेत रासायनिक आणि सेंद्रिय अशा दुहेरी पद्धतीने खत व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होत असल्याचे दत्ताराम नाईक सांगतात.

Cashew Orchard
Cashew Production : काजू बी उत्पादन २० टक्केच ; अतितापमान, धुक्याचा परिणाम; प्रति किलोला १७५ रुपये दर

मागील कामकाज :

- मागील हंगाम संपल्यानंतर बागेतील कामकाजास सुरुवात केली जाते. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजू बागेमधील कामांना देखील काहीसा विलंब झाला. सप्टेंबरमध्ये बागेमध्ये तण नियंत्रणाकरिता तणनाशकाची फवारणी करण्यात आली. त्यानंतर शिल्लक राहिलेले तण ऑक्टोबर महिन्यात ग्रासकटरच्या मदतीने कापून घेतले.

- साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कलमांना नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली. या कालावधीत ढगाळ हवामान आणि पावसाची स्थिती होती. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ढेकण्या म्हणजेच टी मॉस्किटो बग या किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात झाली. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची पहिली फवारणी या काळात घेतली.

- नोव्हेंबरमध्ये हलकी थंडी सुरू झाल्यामुळे पालवीचे प्रमाण वाढले. काही झाडांना मोहर देखील फुटू लागला. परंतु या कालावधीत धुक्यांचे प्रमाण देखील वाढले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण बागेची पाहणी केली. काही कलमांवर बदलत्या हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव काहीसा दिसून येत होता. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली. त्यानंतर दर २० ते २५ दिवसांनी फवारण्या घेण्यात आल्या. अशा एकून ५ वेळा रासायनिक फवारण्या घेण्यात आल्या आहेत.

Cashew Orchard
Cashew Farming : ओल्या काजूगर विक्रीचा पर्याय ठरतोय सक्षम

आगामी नियोजन :

- यंदाचा काजू हंगाम २० जानेवारीनंतर सुरू झाला आहे. सुरुवातीस धीम्या गतीने सुरू असलेल्या हंगामास मागील वीस ते बावीस दिवसांपासून गतीने आली आहे. कलमांवरून जमिनीवर पडलेले आणि एक ते दोन दिवसांत परिपक्व होऊन जमिनीवर पडण्याची शक्यता असलेल्या काजू बी ची काढणी करण्याचे काम सुरू आहे. बागेतील सर्व काजू बी गोळा केल्यानंतर प्रतवारी केली जाईल. त्यानंतर एक-दोन उन्ह देऊन साठवणुकीसाठी ठेवण्यात येतील.

- यंदाचा हंगाम साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत चालेल असा अंदाज आहे. बागेतील सर्व काजू बी गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेण्यात येईल.

- काजू हंगाम संपल्यानंतर बागेत पडलेला पालापाचोळा गोळा करून झाडांच्या बुंध्यावर रचून ठेवला जाईल. जेणेकरून पाऊस पडल्यानंतर पालापाचोळा कुजण्याची प्रकिया सुरू होईल.

खत व्यवस्थापन :

बागेत रासायनिक आणि सेंद्रिय अशा दुहेरी पद्धतीने खत व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. कलमांना त्यांच्या आकारमानानुसार आणि वयानुसार रासायनिक, सेंद्रीय, शेणखत दिले जाते. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होते. प्रतिझाड सुरुवातीला एक ते अर्धा किलो १९.१९.१९ हे रासायनिक खत दिले जाते. शिवाय दोन किलो सेंद्रीय आणि पाच ते सहा किलो शेणखत अशी खताची मात्रा दिली जाते. झाडाच्या आकाराप्रमाणे खतांचे प्रमाण ठरते. त्यानंतर दर महिन्याला पावसाची तीव्रता कमी असताना अर्धा ते पाव किलो खतमात्रा दिली जाते.

पावसाळ्याच्या कालावधीत बागेत कोणतीही कामे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बागेत तण चांगलेच वाढले होते. नोव्हेंबरमध्ये बागेत वाढलेली लहान झुडपे, गवत काढून घेतले. बागेतील कलमांच्या खाली पडलेला पालापाचोळा एकत्र गोळा करून बाग स्वच्छ केली. ते कुजण्यासाठी कलमांच्या बुंध्यात रचून ठेवले जाते. जेणेकरून कुजल्यानंतर कलमांस त्याचा फायदा होईल, असे दत्ताराम नाईक सांगतात.

दत्ताराम नाईक, ९७६४९३८५४४ (शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com