Cashew Rate
Cashew Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : आजऱ्यात काजू बीची आवक थंडावली

Team Agrowon

Ajara, Kolhapur News : येथील बाजारपेठेत काजूची आवक (Cashew Arrival) थंडावली आहे. एप्रिलच्या मध्यावर काजू बीचा बाजार (Cashew Nut Market) वधारणार असून, स्थानिक बी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होईल.

पण स्थानिक बीला म्हणावा तसा दर (Cashew Nut Rate) मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. सध्या शंभर रुपयांच्या आतच स्थानिक काजू बीची विक्री होत आहे. काजू प्रक्रिया युनिटधारकांकडून परदेशी काजू बीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

यंदा काजूचे उत्पादन चांगले होणार असल्याची चिन्हे आहेत. वातावरण, कीड, रोगाचा फटका काजू उत्पादनावर विशेष झाला नाही. तरीही धुके व थंडी काही प्रमाणात राहिल्याने काजू बी तयार होण्यास वेळ लागला.

दरवर्षी मार्चच्या अखेरीस काजू बी बाजारात येते. यंदा मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू बीची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होईल, असे सांगण्यात येत आहे. दोन, तीन आठवडे बाजार रिकामेच गेले.

काजूची आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही. शुक्रवारच्या (ता. २४) आठवडा बाजारात सात-आठ व्यापाऱ्यांनी काटे लावले होते.

त्यांच्याकडे चार-पाच क्विंटल स्थानिक मालाची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या परदेशातून काजू बीची आवक सुरू आहे. ११० रुपयांपासून १३० पर्यंत दर्जानुसार परदेशी मालाची खरेदी होत आहे.

अधिक प्रमाणात परदेशी माल काजू कारखानदारांकडून खरेदी केला जात आहे. या काजू बीला उतारा चांगला असल्याने मागणी आहे. स्थानिक काजू बी शंभर रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जात आहे.

कोकणातील स्थानिक बीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने ११० रुपये प्रतिकिलो दराने चांगल्या प्रतीचा माल बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे आजरा परिसरातील काजू बीचा दर १०० रुपये प्रतिकिलो आहे. यंदा काजू बीचा काउंट किलोला २०० ते २१० इतका असल्याने मागणी जास्त नाही. एप्रिलनंतर स्थानिक काजू बी बाजारात येईल.
- अक्षय बिल्ले, काजू व्यापारी, आजरा

https://www.youtube.com/watch?v=6iEjNEwgcFoदृष्टिक्षेप

आजरा तालुक्यातील काजू लागवड ः ४ हजार ६०० हेक्टर

सरासरी उत्पादन ः ९०० ते १२०० किलो सरासरी हेक्टर

तालुक्यातील वार्षिक उत्पादन ः ४ हजार टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT